Headlines

पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०७ परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध…

Read More

हिंगोली झेडपीत 112 शिक्षकांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती:अवघ्या दोन तासात प्रक्रिया पूर्ण, सीईओ गायकवाड यांचा पुढाकार

हिंगोली जिल्ह्यातील ११२ शिक्षकांना अवघ्या दोन तासात समुपदेशनाने उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून मंगळवारी ता. ३० हि प्रक्रिया पार पडली आहे. सर्वच मुख्याध्यापकांना पदोन्नती नंतर हवे ते ठिकाण मिळाल्यानंतर आता शाळेच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८८० प्राथमिक…

Read More

चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू:अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी

चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील मूल येथील चिकली चक क्रमांक २ मधील सर्व्हे नंबर ७८ च्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू अत्यंत संशयास्पद मानला जात आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास…

Read More

चौथीच्या गणित पुस्तकात मुद्रणदोष आढळले:पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; पाठ्यपुस्तक मंडळाची माहिती

इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहेत. या त्रुटींची दखल घेण्यात आली असून, सुधारित माहिती क्यूआर कोडद्वारे व्हिडिओ स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाने दिली आहे. पुणे येथील पाठ्यपुस्तक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यापैकी मराठी आणि…

Read More

मेयोचे विभागाध्यक्ष डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात:फिटनेस प्रमाणपत्रासाठी RTO अधिकाऱ्याकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल आणि लघुलेखक आशिष मेटेकर यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या वैद्यकीय आणि शासकीय वर्तुळात…

Read More

राज्यात पावसाची जोरदार हजेरी:मुंबई मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली; तर पालघर, हिंगोलीत शेतकरी सुखावला

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. जून महिना संपत आलेला असतानाच सुरू झालेल्या या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आणि पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह उपनगरे, पालघर, भिवंडी आणि हिंगोली जिल्ह्यात आज पावसाचा जोर प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे कुठे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, तर कुठे पाणीटंचाईचे संकट टळल्याने नागरिकांना…

Read More

Gaurav Khanna on Akanksha Chamola Divorce; Says She is My Wife

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १९ चा विजेते गौरव खन्नाने त्याची पत्नी आकांक्षा चमोलाशी घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आकांक्षाने नुकतेच रिॲलिटी शो ‘लॉक अप सीझन २’ मध्ये गौरवपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ३० जून रोजी ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटबाहेर मीडियाशी बोलताना गौरव म्हणाला की, तो आकांक्षाला नेहमीच पाठिंबा देईल,…

Read More

कॉकरोच जनता पक्षाचे जंतर-मंतरवर 11व्या दिवशी आंदोलन:उपोषणकर्ते वांगचुक यांची तब्येत बिघडली, पोलिसांवर समर्थकांना रोखल्याचा आरोप

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर ११व्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. दरम्यान, तिथे तीन दिवसांपासून उपोषण करत असलेल्या लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची मंगळवारी तब्येत बिघडली. वांगचुक यांची रक्तातील साखरेची पातळी ६६ पर्यंत खाली आली आहे, जी सामान्यपेक्षा कमी मानली जाते. वांगचुक २८ जूनपासून उपोषण करत आहेत. ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

सुकन्यामध्ये 8.2%, PPF वर 7.1% व्याज मिळत राहील:लघु बचत योजनांच्या व्याजदरात बदल नाही, सलग 10 व्या तिमाहीत व्याजदर स्थिर

सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), पोस्ट ऑफिस FD, सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांसारख्या लघु बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. व्याजदरांमध्ये कोणताही बदल न होण्याची ही सलग 10वी तिमाही आहे. सरकारने शेवटचा व्याजदर डिसेंबर 2023 मध्ये वाढवला होता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर 7.1% व्याजदर पब्लिक प्रॉव्हिडंट…

Read More

ज्ञानप्रबोधिनी, निगडीत 2 जुलैला 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर'चे उद्घाटन:ग्रामीण नवोपक्रम, उद्योजकता आणि समुदाय विकासाला मिळणार चालना

ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर – ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन (ACIC-JPIF)’ चे उद्घाटन २ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) संस्थापक संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता मनोहर सभागृहात हा सोहळा पार पडेल. या केंद्राद्वारे ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सक्षम व्यासपीठ…

Read More