Headlines

मोसंबीला भाव नाही; 450 झाडांवर चालवला जेसीबी:पिंपळगाव पेठ येथील शेतकऱ्यांची चार वर्षांची मेहनत झाली मातीमोल‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील शेतकरी खेमचंद फुले यांनी मोसंबी पिकाला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आपल्या शेतातील ४५० मोसंबीच्या ओल्या झाडांवर जेसीबी चालवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. २०२१ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर मोठ्या अपेक्षेने मोसंबीची लागवड करण्यात आली होती. मात्र चार वर्षे सतत पाणी, खत, औषधे, मजुरी आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च करूनही बाजारात मोसंबीला…

Read More

Film style fight between doctors and nurses at Ladsawangi Health Center

लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या उपचारावरून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध करमाड ठाण्यात तक्रार . शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळकुंठा येथील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ….

Read More

10 मंदिरे उडवण्याची धमकी, खालिस्तान नॅशनल आर्मी कोण?:पाक – अझरबैजानमध्ये बैठक, 7 राज्यांत नेटवर्क; RSS मुख्यालयही लक्ष्य

‘तुमची हिंदू मंदिरे लक्ष्यावर आहेत. दिल्ली आणि हरियाणाच्या लोकांनो, तुम्ही 6 जून 1984 रोजी भिंडरांवालेच्या मृत्यूवर मिठाई वाटली होती. आता आम्ही याचा बदला तुमच्या मंदिरांमध्ये स्फोट करून घेऊ. म्हणून तुमच्या मुलांना वाचवा आणि 5-6 जून रोजी कोणताही प्रवास करू नका.’ 4 जून रोजी सकाळी 9:54 वाजता पंचकुलाचे महापौर श्यामलाल बन्सल यांना धमकीचा हा ई-मेल मिळाला….

Read More

भाविकाने शिवाई संस्थानला 15 गुंठे जमीन केली दान:शिवना येथील ग्रामस्थांकडून कैलाश काळे यांचा सत्कार

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथिल ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिरालगतची १५ गुंठे जमीन शिवना येथील भूमिपुत्र तथा डोंबिवली येथिल व्यावसायिक कैलाश श्रीरंग काळे यांनी संस्थानला दान केली. त्यानिमित्त काळे यांचा संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. शिवना गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत श्री. शिवाई देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला नुकताच शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा…

Read More

40 फुटांच्या विहिरीमधून बिबट्याची केली सुटका:हनुमंतगावला शिकारीच्या शोधात पडला विहिरीत‎

शिकारीच्या शोधात असताना एक बिबट्या ४० फुट विहिरीत पडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे रविवारी सकाळी समोर आली. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब वन विभागाला कळवण्यात आली. विहिरीतील मोटरच्या पाइपला मिठी मारून बिबट्या बसला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुटका केली. गट क्रमांक १०१ मध्ये भाऊसाहेब मोईन यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे समोर…

Read More

नदीत वाहून जाणाऱ्या शाम्पू पुड्या पकडताना तिघींचा बुडून मृत्यू:दोन बहिणींसह काकूचा करुण अंत, मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात घटना

सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी व पोहण्यासाठी गेल्यानंतर तरुणीच्या हातातील शाम्पूच्या १० पुड्या निसटून पाण्यात वाहू लागल्या. त्या घेण्यासाठी तिने तेलाचा प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेऊन खोल पाण्यात प्रवेश केला. पाण्यात डब्याचे झाकण उघडले. डब्यात पाणी शिरले. त्याच वेळी तरुणी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तिची बहीण पाण्यात गेली. बहिणींच्या मागे काकूही…

Read More

21 जूनपर्यंत 8 राशींसाठी फायद्याचा काळ:वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत जबाबदारी आणि धनु राशीला थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता

15 ते 21 जून 2026 पर्यंत मेष राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. कर्क राशीच्या नोकरदार लोकांनी वेळेवर काम पूर्ण केल्यास त्यांना पदोन्नती मिळण्यास मदत होईल. कन्या राशीच्या सरकारी नोकरदार लोकांशी अधिकारी समाधानी राहतील. धनु राशीच्या…

Read More

राष्ट्रवादीचा अर्थ खाते परत मिळवण्यासाठी प्रचंड दबाव:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले – सध्यातरी अर्थ खाते हे माझ्याकडेच

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “वित्त आणि नियोजन’(अर्थ खाते) स्वतःकडेच राखण्यासाठी भाजप आणि ते पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पडद्यामागे तीव्र संघर्ष सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या तिजोरीच्या चाव्या सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. आगामी २२ जून २०२६ च्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मूळ सत्तावाटपाचा हवाला देत राष्ट्रवादीने हे…

Read More

‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुविधेचा गैरवापर:फलटणला ‘तुकडेबंदी’ला बगल देत 1545 दस्तांची बोगस नोंदणी, सहदुय्यम निबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक २ चे सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) दीपक सावळा पवार यांच्यावर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. “एक जिल्हा एक नोंदणी’ या सुविधेचा गैरवापर करून जानेवारी ते एप्रिल २०२६ या ४ महिन्यांत तब्बल १,५४५ दस्तऐवजांची संशयास्पद नोंदणी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने…

Read More

बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच ‘टनेल हूड्स’ तंत्रज्ञानाचा वापर!:अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास शांत आणि आरामदायी होणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतात पहिल्यांदाच डोंगराळ बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रगत “टनेल हूड्स’ तंत्रज्ञान बसवण्यात येत आहे. ३०० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावणारी ट्रेन जेव्हा बोगद्यात प्रवेश करेल तेव्हा सिलिंडरमधील पिस्टनप्रमाणे हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो. या दबावामुळे ट्रेन बाहेर पडताना होणारा तीव्र “टनेल बूम’ (धडधडणारा आवाज) आणि हादरे रोखण्याचे मोठे काम हे हूड्स करणार आहेत….

Read More