मणिपूरच्या उखरुलमध्ये आसाम रायफल्सचा विरोध, बंकर तोडले:महिलांनी जवानांवर आणि त्यांच्या गाड्यांवर पेट्रोल टाकले; संघर्षात 22 जखमी
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील शोक्वाओ आणि न्यू हेवन परिसरात रविवारी सकाळी शेकडो महिला आसाम रायफल्सच्या जवानांच्या आणि वाहनांच्या समोर भिंत बनून उभ्या राहिल्या. मशाल आणि लाठ्या घेऊन या तंग्खुल नागा महिला जवानांना पुढे जाऊ देत नव्हत्या. लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा दिला. तरीही त्या तिथेच ठाम राहिल्या आणि ‘आमची जमीन, आमचा अधिकार’ अशा घोषणा देत राहिल्या. स्थानिक लोकांच्या…