Headlines

पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश:एकाला अटक, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल; ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यात गावोगावी सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, डॉक्टरसह अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या रॅकेटमध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हे दाखल…

Read More

मराठवाड्यातील जलसंपदा विभागाची कार्यालये स्थलांतरित करण्याला विरोध:वैजापूर कृती समितीच्या आंदोलकांचा निषेध, तहसीलदारांना निवेदन

मराठवाड्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयांचे अन्यायकारक व एकतर्फी पद्धतीने स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात वैजापूर तालुका कृती समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उद्देशून निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक २७ मे २०२६ रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेश क्रमांक…

Read More

ATF च्या किमतींवर ₹75.60 प्रति लिटरची मर्यादा लावली:सरकारने ₹10,000 कोटींच्या निधीलाही मंजुरी दिली, यामुळे जेट-फ्यूलच्या किमती नियंत्रित केल्या जातील

मध्य पूर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एअरलाइन्स कंपन्या, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) आणि हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ₹10,000 कोटींच्या एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली. याव्यतिरिक्त, सरकारने देशांतर्गत उड्डाणांसाठी ATF ची किंमत ₹75.60 प्रति लिटरवर निश्चित (कॅप) केली आहे. एटीएफच्या वाढत्या किमती स्थिर करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. बुधवारी (3 जून) नवी…

Read More

बेसमेंटमध्ये खोल्या-किचन, ना वायुवीजन, ना इमर्जन्सी एक्झिट:दिल्लीतील ज्या हॉटेलला आग लागली, त्याचा मालक जवळच अशीच 2 हॉटेल्स चालवत आहे

दिल्लीतील ज्या फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी आग लागून 21 लोकांचा मृत्यू झाला, त्याचा मालक जवळच अशीच आणखी दोन हॉटेल्स चालवत आहे. लवकेश बजाजच्या या दोन्ही हॉटेल्समध्ये तळघरातच स्वयंपाकघर आणि खोल्या आहेत. यात आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) देखील नाही. फ्लरिश स्टे हॉटेल दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये आहे. या परिसरात 400 ते 500 मीटरच्या परिसरात 8…

Read More

Aamir Khan Marriage July 5

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघे या वर्षी 5 जुलै रोजी एका खासगी समारंभात लग्न करणार आहेत. या लग्नात कोणताही भव्य सोहळा किंवा ग्रँड रिसेप्शन ठेवले जाणार नाही. दोघे एका छोट्या साइनिंग सेरेमनीद्वारे त्यांचे नाते अधिकृत करतील. आमिर खानने 2025…

Read More

संत तुकोबांच्या पालखीचे 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान:पायी वारीचे वेळापत्रक जाहीर, देहूत जय्यत तयारी; यंदा 25 जुलैला आषाढी एकादशी

मान्सूनच्या पहिल्या सरी बरसल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाची आणि आषाढी वारीची. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत. यंदा २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी असल्याने वारीचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१…

Read More

पुण्यात घरांच्या विक्रीत 30 ते 35 टक्के घट:युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवड्यामुळे बांधकाम साहित्य महागले; किमती वाढणार

पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिका-इस्त्राइल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचा तुटवडा आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. यामुळे घरांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांना घरे विक्रीसाठी सल्ला देणाऱ्या ‘जस्टो’ कंपनीचे संचालक पुष्पमित्र दास यांनी ही माहिती दिली आहे. पुणे…

Read More

सातारा-तासगाव मार्गावर कारचा भीषण अपघात:नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक; महिलेचा वाहनाखाली दबून मृत्यू, दोघे जखमी

सातारा-रहिमतपूर-तासगाव मार्गावर मंगळवारी मध्यरात्री एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. तासगाव परिसरातील चिरेबंदी हॉटेलजवळ झालेल्या या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील काही नागरिक इनोव्हा कारमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान वाहन अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोरात…

Read More

वर्ध्यामध्ये डिझेलचा टँकर पलटी:इंधन गोळा करण्यासाठी मिळेल ते भांडे घेऊन ग्रामस्थांची धाव, पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला

इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई आणि महागाईचे सावट असतानाच, वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डिझेल वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला असून, सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चक्क जीव धोक्यात घालून गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा दरम्यान हा अपघात घडला….

Read More

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी…

Read More