Headlines

अपघात:ट्रक-एसटीची समोरासमोर धडक; एक ठार, ७ जखमी

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दर्यापूर येथून हिंगणघाटकडे जाणारी एसटी बस लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान पोहोचली असता,…

Read More

पिकांना नवसंजीवनी:दिवसभरात 31 मिमी पाऊस; पूर्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्हाभरात बुधवारी रात्रभर १५.५ मिलिमीटर पाऊस झाला. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.८ मिलिमीटर पाऊस झाला तर शहरात दिवसभरात १६.७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच अकोट तालुक्यात ११.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ ते ४८ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. तसेच पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा 10वा दिवस:लोकसभेत राहुल गांधींविरोधात विशेष हक्कभंग नोटीस, गृहमंत्र्यांविरोधात असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी १०वा दिवस आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दिली आहे. अनुराग यांचा आरोप आहे की, राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर केला. गंभीर आणि निराधार आरोप केले….

Read More

पावसाच्या धारा… ‘स्नेहबंध’चा सहारा:फूटपाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या गरजूंना भेटून छत्रीवाटप‎

पावसाळ्यात फूटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर राहणाऱ्या गरीब, गरजू व निराधार नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात छत्रीवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ‘स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत मार्केट यार्ड, आनंदधाम, माळीवाडा, नगर बसस्थानक, स्वस्तिक चौक, दिल्लीगेट तसेच सावेडी परिसरातील फूटपाथ व रस्त्यांवर…

Read More

एकतर्फी विजयाचा दावा; बंडखोर म्हणतात, निकाल माझ्याच बाजूने:अकोलेत नगरध्यक्षपदासाठी आज मतदान

अकोले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. भाजप नेते तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगरसेविका वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा विजय एकतर्फी होईल, असा दावा केला आहे. मात्र, बंडखोर उमेदवार सोनाली नाईकवाडी यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार देत आपण निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचे सांगितल्याने निवडणुकीतील रंगत…

Read More

शनिशिंगणापूर:देवस्थानच्या 5 वर्षांतील व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

शनिशिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानच्या कारभारात गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींनंतर शासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. जुलै २०२५ मध्ये आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानंतर, आता मुंबईचे विशेष फॉरेन्सिक पथक चौकशीसाठी शनिशिंगणापुरात दाखल झाले आहे. देवस्थानच्या कारभारात मागील काही वर्षांत अनेक अनियमितता समोर आल्या होत्या. अनावश्यक असताना…

Read More

PM मोदींच्या संपादित व्हिडिओ प्रकरणात मेटा-इंडियाच्या प्रमुखांवर FIR:दिल्लीतील आंदोलनानंतरचा व्हिडिओ, नोएडामधील महिलेवरही गुन्हा दाखल

हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एडिट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांसोबत मेटा इंडियाच्या प्रमुखांनाही सह-आरोपी (को-एक्यूज्ड) बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, नोएडा पोलिसांनीही पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी एका महिलेवर झिरो एफआयआर दाखल केला आहे. हैदराबादमध्ये 2 स्वतंत्र गुन्हे दाखल, मेटाला पोलिसांची नोटीस हैदराबाद पोलिसांनी…

Read More

विठ्ठलाच्या नामगजरात पेपरफुटी अन् अन्नभेसळीवर प्रहार:बेल्हेतील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठलनामाचा गजर सुरू असतानाच बेल्हेकरांना समाजाला विचार करायला लावणारा संदेशही अनुभवायला मिळाला. येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी आणि अन्नभेसळ या ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रभावी पथनाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यात परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचे महत्त्व, प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज तसेच…

Read More

Sanjay Singh Targets Kangana Ranaut in Parliament; Demands Action

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी संसदेत भाजप खासदार कंगना रनोट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. संजय सिंह यांनी सभागृहात म्हटले, “यांची एक खासदार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जेन झी आंदोलनात तरुणांसाठी इतकी अश्लील टिप्पणी केली की, मान्यवर, या सभागृहात मी ते…

Read More

शहरात श्रीदत्त देवस्थानमध्ये गुरूपौर्णिमेस भाविकांची गर्दी:अमेरिका ते भारतातील गुरूबंधू-भगिनींचा सहभाग‎

प्रेमदान चौकातील वेदांतनगर येथील प.पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली. भारतासह अमेरिकेतून आलेल्या गुरूबंधू-भगिनींनी श्रीदत्तक्षेत्रातील सद्गुरू अधिष्ठान मंडपात गुरूचरणी लीन होत गुरुपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेतला. उत्सवाच्या पूर्वसंध्येला देवस्थानातील श्री महालक्ष्मी मंडपात कायम विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांच्या हस्ते पाठशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन वस्त्रांची भेट देण्यात आली. श्रीदत्तक्षेत्रातील श्रीदत्तात्रेय निवास, भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर,…

Read More