Headlines

आज सोने ₹756 आणि चांदी ₹3493 ने महाग:10 ग्रॅम सोने ₹1.42 लाखांवर आणि 1 किलो चांदीची किंमत ₹2.19 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,493 रुपयांनी वाढून 2,18,967 रुपयांवर पोहोचली आहे, जी शुक्रवारी 2,15,474 रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 756 रुपयांनी वाढून 1,41,915 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी ते 1,41,159 वर होते. या महिन्यात सोन्याचे दर 283 रुपयांनी…

Read More

उद्धव ठाकरेंच्या पक्षात कार्यकर्ते उरले नाहीत:म्हणून ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात- गिरीश महाजनांचा टोला; संजय राऊतांवरही केली टीका

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR), पर्यावरण, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आणि इतर विविध…

Read More

दशकाच्या अंधाराला लागला अखेर पूर्णविराम:अंजनगाव सुर्जीतील 8 दिवे पुन्हा प्रकाशमान, युद्धपातळीवर दुरुस्ती‎

शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेले तब्बल आठ हायमास्ट दिवे गेल्या दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने शहरात अक्षरशः अंधाराचे सावट पसरले होते. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुख्य रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या समस्येची तातडीने दखल…

Read More

नातवासाठी बालरोगतज्ज्ञ शोधणे पडले महाग:63 वर्षीय वृद्धाची पावणेआठ लाखांची फसवणूक, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन डॉक्टर अपॉइंटमेंट घेताना सायबर चोरट्यांनी पावणेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नातू आजारी असल्याने बालरोगतज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक धानोरी भागात राहतात. त्यांनी संकेतस्थळावरून बालरोगतज्ज्ञांचा मोबाइल क्रमांक मिळवला होता,…

Read More

सर्वपक्षीय आंदोलनाचे फलित:भाजपच्या आंदोलनानंतर हैदतपूर, वडाळा टोल नाका तात्पुरता बंद, 25 कि.मी. परिसरातील नागरिकांना टोल सवलतीची मागणी‎

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ वरील हैदतपूर–वडाळा टोल नाक्यापासून २५ कि.मी. परिसरातील स्थानिक नागरिकांना टोल शुल्कात सवलत द्यावी. रस्त्यासह पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाक्याची वसुली बंद करावी. या मागणीसाठी तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रस्ता रोको आंदोलन सुरू केले. अखेर…

Read More

आदित्य ठाकरेंना भगवी टोपीही नको:उद्धव ठाकरे-राऊतांना बाजूला करून आदित्य ठाकरेंना पक्षाचे नेतृत्व हवे- नवनाथ बन

आदित्य ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर भगवी टोपी काढून आंदोलन सुरू केले. यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुडकावून लावले, आणि आता यांना भगवी टोपी सुद्धा नको आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंना नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी भगवी टोपी हाती घेतली पाहिजे. हिंदु्त्वाचे विचार ठेवले पाहिजे तर तुमचा पक्ष टिकेल….

Read More

शिर्डीत खळबळ!:साईबाबा मंदिराच्या गेटसमोरच थरार, फळ विक्रेता महिलांनी चाकूने वार करत दुसऱ्या महिलेला संपवले

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर रविवारी रात्री एका हत्याकांडाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. फळे विकण्यासाठी उभे राहण्याच्या किरकोळ वादातून चार ते पाच महिलांनी एका ३० वर्षीय फळ विक्रेता महिलेची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे शिर्डीत महिलांचे गुंडराज वाढले आहे का, असा संतप्त सवाल महिलेच्या पतीने उपस्थित केला….

Read More

विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी!:दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जवरून प्रकाश आंबेडकरांची भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी, संवाद आणि शांततापूर्ण आंदोलन हीच खरी लोकशाहीची ओळख असल्याचे सांगत, आंदोलकांचा आवाज दडपणे म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन दडपणे म्हणजे लोकशाहीवरील आघात प्रकाश आंबेडकर…

Read More

बांकेबिहारी मंदिरात महिला शिपायाने भाविकाला मारहाण केली:धक्का लागल्याने संतापली, रांगेतून ओढून चापटी मारल्या, आई म्हणत राहिली- सोडून द्या

मथुरा येथील बांके बिहारी मंदिरात धक्का लागल्यानंतर एका महिला शिपायाने भाविक तरुणाला बेदम मारहाण केली. संतप्त शिपायाने तरुणाचा टी-शर्ट पकडून त्याला रांगेतून बाहेर ओढले आणि सटासट कानशिलात लगावले. 25 सेकंदात त्याला 8 चापटी मारल्या. मुलाला मारहाण होताना पाहून आई रडत ओरडत राहिली, “मारू नका, तो मरून जाईल.” आजूबाजूचे लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत राहिले, पण…

Read More

Delhi Protest Controversy; Aditya Thackeray, Supriya Sule Slam Government

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि इतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्तानंतर देशातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ . रोहित पवारांचा हल्लाबोल; “इंग्रजांनाही लाजवणारं सरकार” रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर…

Read More