ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात शिवेश्वर देवस्थानची पायी दिंडी पंढरीकडे रवाना:यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष, 18 दिवसांचा पायी प्रवास
टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा-माऊलीच्या जयघोषात शेलगावनजीकच्या वाकी येथील श्रीक्षेत्र शिवेश्वर देवस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रिमझिम पावसाच्या साक्षीने भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हा पालखी . शिवेश्वर देवस्थानचे उत्तराधिकारी नामदेव महाराज पल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. सकाळी नामदेव महाराजांच्या हस्ते विधीवत पालखी पूजन झाल्यानंतर…