Headlines

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎

शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…

Read More

डॉक्टरांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत व्यवसायाचे पावित्र्य जपावे- डॉ. दौंड:पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयात ‘डॉक्टर्स दिन’ उत्साहात साजरा‎

डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन नसून मानवतेची सेवा, करुणा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव जपणारा एक पवित्र मार्ग आहे. आजच्या काळात काही ठिकाणी वैद्यकीय क्षेत्र आर्थिक फायद्याशी जोडले जात असल्याचे चित्र आहे, ही बाब चिंताजनक आहे. डॉक्टरांनी आर्थिक लाभापेक्षा रुग्णांची सेवा आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देत आपल्या व्यवसायाचे पावित्र्य जपले पाहिजे,…

Read More

घाटनांद्र्यात अंगणवाडीजवळ घाणीचे साम्राज्य; बालकांचे आरोग्य धोक्यात:शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस; नगरखाना परिसरात साचले पाणी‎

परिसरात शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गावातील अंगणवाडी परिसराला घाणीच्या आणि दुर्गंधीच्या साम्राज्याने वेढले असून, लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा रस्ता प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा आणि लहान मुलांच्या अंगणवाडीचा मार्ग आहे. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे या घाणीचा चिखल झाला असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावर पाणी तुंबणे…

Read More

विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी‎

तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य…

Read More

भरधाव वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या:कारण अस्पष्ट, गोलटगाव फाटा परिसरातील घटना‎

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील गोलटगाव फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणाने भरधाव अज्ञात वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पवन कडूबा बुचुडे (वय २२, रा. शेवगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जाणाऱ्या एका वेगवान अज्ञात वाहनासमोर पवनने अचानक उडी घेतली. या भीषण अपघातात तो गंभीर…

Read More

लासूर रेल्वे गेट बंद राहिल्याने डोणगावच्या व्यक्तीचा मृत्यू:वेळेत उपचार मिळाले नाही, एकाच महिन्यात घडली दुसरी घटना‎

येथील रेल्वे गेट वेळेत न उघडल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि डोणगाव येथील हरिदास रुस्तम वाकळे (४३) या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिदास वाकळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पत्नी व…

Read More

जिल्हा बँकेची आज 8 टेबलवर मतमोजणी, बँकेच्या सभागृहात सकाळी 8 वाजेपासून मोजणी, 12 वाजेपर्यंत हाती येणार निकाल‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ८ टेबलवर मतमोजणी सुरू होणार आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे,…

Read More

वाकला जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांकडून थाळीनाद आंदोलन:सहा शिक्षकांची पदे भरण्याची मागणी, सोमवारी पायी दिंडी काढण्याचा निर्धार‎

तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांची पदे रिक्त असून, ती भरण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेस कुलूप ठोकले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी भर पावस . हातात थाळ्या आणि चमचे घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला शिक्षक द्या, शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुसळधार…

Read More

मुंबईत 12 तासांत 200mm पाऊस, शाळा-कॉलेज बंद:गुजरातेत अंबिका नदीवरील पूल वाहून गेला; MP – ओडिशाला रेड अलर्ट

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग पकडला आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरातच्या जुनागढमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. IMD ने मच्छिमारांना 8 जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. नवसारी येथील अंबिका नदीवरील पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा…

Read More

छत्तीसगडचे हत्ती गडचिरोलीमध्येच स्थिरावले:संख्या 23 वरून 32 वर, सुरक्षेसाठी वन विभागाची हायटेक यंत्रणा सक्रिय

गडचिरोलीच्या जंगलात लोकांना आता एका नव्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींनंतर आता छत्तीसगडमधून आलेल्या रानटी हत्तींचा मुक्त वावर लोकांना ते जाता -येताना पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आलेल्या 23 वन्य हत्तींच्या कळपात नव्या पिल्लांचा जन्म झाल्याने ही संख्या आता 32 वर पोहोचली…

Read More