महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर भारतरत्न द्या:अविनाश ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची मागणी केली आहे. आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ही मागणी करण्यात आली. ठाकरे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर…