Headlines

इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाच्या जाहिराती:सरकार नोटीस पाठवून मेटाला विचारेल- अशा जाहिराती कशा चालल्या, त्यांना कसे थांबवले जाईल

इंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकार मूळ कंपनी मेटाला समन्स पाठवेल. मंत्रालय मेटाला विचारेल की, इंस्टाग्रामवर अशा जाहिराती कशा प्रसारित झाल्या आणि त्यांना थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मने कोणती पावले उचलली. यासोबतच, मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी कंपनीची काय धोरणे आणि व्यवस्था आहेत, हे देखील विचारले जाईल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान…

Read More

Smart Meter Row in Maharashtra Assembly; Nana Patole Slams Govt

राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून . राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण राज्यात विविध विद्युत कायद्यानुसार सर्व वीज वितरण कंपन्यांसाठी ‘स्मार्ट मीटर’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,…

Read More

आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या

चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन धक्कादायक घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, उपमहापौर संजय घाडी यांनी या बेजबाबदारपणासाठी थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना…

Read More

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे:'फार्म टू प्लेट' कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध…

Read More

हिंगोलीत टीनपत्रे काढून दुकान फोडले:चोरट्याने 2.40 लाख रुपये पळविले, सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरटयाने गल्लयातील २.४० लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ३ पहाटे घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बांगरनगर भागात वैजनाथ जाधव यांच्या मालकिचे…

Read More

2022 नंतर पक्ष कमजोर झाला होता:उद्धवसाहेब, तुमचं ठीक; पण आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रभर फिरवा म्हटलं होतं; बंडू जाधव पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर आता पक्ष सोडलेल्या खासदारांकडून एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी परभणीचे खासदार संजय ऊफ बंडू जाधव यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मौन सोडत पक्ष सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचं सांगतानाच, संघटनेकडे झालेलं दुर्लक्ष आणि स्थानिक राजकारणामुळे…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. आज दोघांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी…

Read More

लातूरमध्ये सावकारी पाश:मित्राच्या दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची शेती, निलंग्यात अनेकांवर गाव सोडण्याची वेळ

एका चुकीच्या निर्णयाने आणि माणुसकीपोटी घेतलेल्या जामीनदारीने एका शेतकऱ्याचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याचे विदारक वास्तव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ‘नणंद’ गावातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून गावातील भोसले कुटुंब खासगी सावकाराच्या अशा चक्रव्यूहात अडकले आहे की, त्यांना त्यांची पाच एकर शेती गमवावी लागली आणि तरीही सावकाराचा ‘कर्जाचा तगादा’…

Read More

काँग्रेसने राम मंदिरातील देणगी चोरीवर प्रश्न उपस्थित केले:राठोड म्हणाले- सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी; SIT वर आक्षेप

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ठियोगचे आमदार कुलदीप राठोड यांनी राम मंदिरात कथित देणगी चोरीच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) कार्यरत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा आणि दोषींना वाचवण्याचा…

Read More

जळगावात लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी ACB चा मोठा छापा:कोट्यवधींचे घबाड उघड, तब्बल 2.94 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त

जळगाव येथे एका अधिकाऱ्याच्या घरावर पडलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे कार्यरत असलेल्या व जळगावात वास्तव्यास असलेल्या एका मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले असून, एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी बेहिशोबी संपत्ती याठिकाणी सापडली आहे. जळगावमधील…

Read More