हिंगोली जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल:गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या विभाग बदल्या अखेर पूर्ण
हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधून मागील पाच वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता.1 काढले आहेत. या विभाग बदल्यांमुळे जिल्हा परिषद बदल्यांनी ढवळून निघाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सातत्याने…