लोकसहभाग अन् नियोजनातून बोराडीने साधला आदर्श विकास:नागपूर अपर आयुक्त वर्षा गौरकर यांच्याकडून कामांचे कौतुक
आदिवासी भागातील मोठी ग्रामपंचायत असूनही तालुक्यातील बोराडी येथे विकासकामांचे उत्तम नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभागाच्या बळावर विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले मंदिर असो वा ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेले विकास उपक्रम, या सर्वांमधून गावाची एकजूट आणि विकासाची सकारात्मक दिशा स्पष्टपणे दिसून येते, असे गौरवोद्गार विभागस्तरीय मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा तथा नागपूर अपर आयुक्त (विकास)…