Headlines

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली:२८ प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा

ज्या प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झाली होती, परंतु त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती या तारखेनंतर झाली, अशा २८ प्राध्यापकांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे संबंधित प्राध्यापकांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झाला…

Read More

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More

गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध:मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर आधारित गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी केले. दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी…

Read More

दिल्ली लाठीचार्ज निषेधार्थ दर्यापुरात विरोधकांचा रास्ता रोको:भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग

दर्यापूर येथे केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाने रास्ता रोको आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख राजकीय पक्षांचे…

Read More

अभिजीत दीपके म्हणाले- CJP ची पुढील रणनीती लवकरच सांगू:कालच आंदोलन संपले, थोडा वेळ द्या; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर चर्चा सुरू

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले- “पुढील रणनीती लवकरच जाहीर करू. पेपरफुटीविरोधातील आंदोलन कालच संपले आहे. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या.” न्यूज एजन्सी ANI नुसार, जेव्हा त्यांना पंजाबमधील पेपरफुटीबाबत त्यांची रणनीती काय असेल असे विचारण्यात आले, तेव्हा दीपके यांनी उत्तर दिले की, त्यावरही चर्चा करू. आम्ही सध्या यासाठी नियोजन करत आहोत. सरकारसोबतच्या…

Read More

जंतर-मंतर आंदोलनातील कथित पोलिस अत्याचाराची NHRC कडे तक्रार:मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशीची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कथित पोलिस अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील ॲड. विकास शिंदे यांनी यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शांततापूर्ण आंदोलन…

Read More

कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेला:माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली सभेत पवारांचे प्रतिपादन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ ची जबाबदारी स्वीकारून कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत कसा प्रसृत होईल, याची काळजी घेतली. आज या संस्था जपल्या पाहिजेत, कारण त्या केवळ संस्था नसून विचारधारा आहेत. महात्मा गांधीजींचा विचार जतन करणे आणि तो वाढवणे हे व्रत…

Read More

नागपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या जागेचा निर्णय महिनाभरात:हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील वाढत्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पारडी परिसरात ‘नागपूर स्किल सेंटर’ उभारण्यात आले आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID), टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ…

Read More

Congress Tiranga March in Chandivali; Demand Apology Over NEET Controversy

नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या वत . या तिरंगा मार्चचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आरिफ नसीम खान तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले….

Read More