राजीव गांधींच्या विचारांची देशाला आजही गरज:बी. संदीप यांचे प्रतिपादन; जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सकारात्मक आणि विकासाभिमुख विचारांची देशाला आजही गरज आहे. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. संदीप यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीतर्फे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास…