जळगावमधील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर राज्यभरात संताप:ग्रामसभांवर बहिष्काराचा संघटनेचा मोठा निर्णय
जळगाव जिल्ह्यातील शिवरे ग्रामपंचायतचे ग्राम पंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर ग्रामसभेत दबाव टाकल्यामुळे सोमवारी ता. 17 त्यांचा ऱ्हदयविकाराने मृ्त्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील व आगामी काळातील ग्रामसभा घेतल्या जाणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत…