शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीच्या भूसंपादनासाठी फडणवीस दिल्लीत:मोदींसमोर सादरीकरण, 8 हजार एकर जागेसाठी निधीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव, व्यापार व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मोदींसमोर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केले. पुणे मेट्रो ३ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मोदींकडे वेळ मागितली. फडणवीसांच्या…