Headlines

आता रोज होणार एअर इंडिया पायलट्सची ड्रग टेस्ट:फुकेट-दिल्ली फ्लाइटच्या पायलटचा डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कारवाई

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व वैमानिकांची आता दररोज ड्रग्ज चाचणी होणार आहे. दोन्ही एअरलाईन्सने वैमानिकांच्या सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्स चाचणीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या सूत्रांनुसार, या चाचणीत कोणत्याही वैमानिकाने प्रतिबंधित औषधे किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले आहे का, याचीही तपासणी केली जाईल. दोन्ही एअरलाईन्समध्ये 5 हजारांहून अधिक वैमानिक आहेत….

Read More

अयोध्येच्या देणगीनंतर नाशिकच्या कुंभमेळ्यातही पैशांचा खेळ?:निकृष्ट कामांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याचाही आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना राज्यातील सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांवरून त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अयोध्येतील मंदिर उभारणीच्या देणगीवरून झालेल्या वादानंतर, आता नाशिकमध्येही कुंभमेळ्याच्या कामात भाजपच्या नेतृत्वाखाली असाच प्रकार सुरू…

Read More

कुर्ला दरड दुर्घटना:मृतांचा आकडा 8 वर, तर 4 जणांची सुखरूप सुटका; बचावकार्य अखेर थांबले

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध आणि बचाव मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुरुवारी दुपारी १.२५ वाजता नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मोहीम अधिकृतपणे बंद केली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शोधमोहीम पूर्ण दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफ, मुंबई महापालिका…

Read More

Wipro Hiring Controversy; NITES Complaint to Ministry Over Delay

विप्रोच्या ‘एलिट भरती २०२५’ प्रक्रियेत निवड झालेल्या २०० हून अधिक विद्यार्थी आणि तरुण अभियंत्यांचा सेवेत समावेश रखडल्याने ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ (NITES) या संघटनेने भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे औपचारिक तक्रार . या प्रकरणात मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावित उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ‘नाइट्स’ने केली आहे. ‘नाइट्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या उमेदवारांनी…

Read More

पुण्याच्या तनिष कुलकर्णीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 'मेरिटोरियस अवॉर्ड':गणितीय मॉडेलिंगमध्ये भारतीय संघ सर्वोत्तम 11 मध्ये

पुण्यातील विद्यार्थी तनिष कुलकर्णी आणि त्याच्या संघाने आंतरराष्ट्रीय गणितीय मॉडेलिंग चॅलेंज (IM²C) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ‘मेरिटोरियस अवॉर्ड’ पटकावला आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम ११ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तनिष कुलकर्णीसोबत अंशवीर बिंद्रा, निपुण साहा आणि वेदांश साहा यांचा या संघात समावेश होता. राष्ट्रीय फेरीत अव्वल दोन संघांमध्ये निवड झाल्यानंतर टीम इंडियाने…

Read More

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस रोपवाटिका प्रशिक्षण:30 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी, दर्जेदार बेणे निर्मितीवर भर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे ऊस पिकासाठी दर्जेदार बेणे निर्मिती, ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांवरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लिमिटेड, लक्ष्मीनगर, जिल्हा नांदेड यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात 30 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडूपाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, भोसरी एमआयडीसी पोलिसांत नोंद

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड (वय २३) यांनी मोशी परिसरातील संजय गांधी नगर झोपडपट्टीत राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री घडली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त…

Read More

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेचा आरोप, राहुल गांधी सुप्रीम कोर्टात पोहोचले:ईडी-सीबीआय चौकशीच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यात न्यायालयाने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांची CBI आणि ED कडून पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होईल. याव्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात…

Read More

दगडूशेठ मंदिर परिसरातील पोलिस कार्यालये हलवण्याची मागणी:'अ' दर्जा मिळाल्याने भाविकांच्या सोयीसाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कार्यालये पर्यायी जागेत हलवण्याची मागणी केली आहे. मंदिर ट्रस्टला शासनाकडून तीर्थस्थळ ‘अ’ दर्जा मिळाल्याने आणि दररोज सुमारे ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढती गर्दी व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मागणीसंदर्भात आमदार रासने यांनी मुख्यमंत्री…

Read More

अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला:उपचारासाठी रुग्णालयात दाखल

शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घडला असून, यामध्ये बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने सध्या ते धोक्याबाहेर आहेत. हल्ला नेमका कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंह बादल हे आपल्या कुटुंबासह नांदेडमधील…

Read More