Headlines

'उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी एकनाथ शिंदेच दिसतात!':शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? रामदास कदम यांचा पलटवार

“उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसतात,” अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली असून, शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती, तेव्हा पंतप्रधान तुमचे बॉस झाले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो, हे…

Read More

हल्द्वानीच्या रेणूचे केस 8 फूट 10 इंच लांब:जगातील सर्वात लांब केसांचा विक्रम केला, युक्रेनच्या आलिया नासिरोवाला मागे टाकले

हल्द्वानीच्या रेणू धरियाल यांनी त्यांच्या 8 फूट 10 इंच लांब केसांमुळे जगात ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या केसांची लांबी 271.50 सेंटीमीटर नोंदवली गेली आहे. यासोबतच रेणूचे नाव प्रतिष्ठित जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. त्यांनी युक्रेनच्या आलिया नासिरोवाचा विक्रम मोडला आहे. आलियाचे केस 257.33 सेंटीमीटर म्हणजे 8 फूट 5.3 इंच लांब होते. रेणू लांब केसांबाबत…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:माहुली पुलावर पोलिसांची कारवाई, पिस्तूल-काडतुसांसह तरुण ताब्यात

शस्त्र विक्रीच्या उद्देशाने माहुली परिसरात आलेल्या एका तरुणाला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आदेश पांडूरंग बिरामणे (वय 30, रा. दुर्गा सोसायटी, धनकवडी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. माहुली पुलाजवळ एक तरुण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी…

Read More

माण तालुक्यात वयस्कर दाम्पत्याच्या घरावर दरोडा:सात आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

माण तालुक्यातील लोधवडे येथील नाळावावस्तीवर मध्यरात्री वयस्कर दाम्पत्याच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा दहिवडी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी सात आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक:रहिमापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी गजानन राजू तायडे (वय २६) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन तायडेची सुमारे वर्षभरापूर्वी पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला. फिर्यादीनुसार, ६ ऑगस्ट…

Read More

CJI सूर्यकांत म्हणाले- फक्त कायदे बनवल्याने न्याय मिळणार नाही:इंदूरमध्ये म्हटले- जनता आणि न्यायव्यवस्थेमध्ये अंतर नसावे

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले- फक्त कायदे बनवल्याने सामान्य लोकांपर्यंत न्याय पोहोचू शकत नाही. न्यायव्यवस्था आणि जनता यांच्यात अंतर नसावे. गरजू व्यक्ती जेव्हा कायदेशीर मदतीसाठी पोहोचेल, तेव्हा आधी त्याचे म्हणणे ऐकून घेतले जावे, त्याला सन्मान मिळावा. गरजूची समस्या समजून घेतली जावी. इंदूरमधील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 8 आणि 9 ऑगस्ट रोजी आयोजित पश्चिम क्षेत्रीय परिषदेत न्यायमूर्ती…

Read More

अमरावतीचे राजकमल, गांधी चौक परिसर लख्ख प्रकाशाने उजळणार:आमदार सुलभाताई खोडके यांच्या निर्देशानंतर विकासकामांना गती

अमरावती शहरातील राजकमल चौक ते अंबागेट आणि गांधी चौक ते जवाहर गेट या मध्यवर्ती आणि अतिवर्दळीच्या परिसराची आमदार सुलभाताई खोडके यांनी शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. वाहतुकीसाठी सुटसुटीत आणि लख्ख प्रकाशाने उजळणारा परिसर तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे निवडक पदाधिकारी, अधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आमदार खोडके…

Read More

ट्रेलर रिव्ह्यू: टॉक्सिक:बंदुका खूप चालल्या, पण कथा एक पाऊलही पुढे सरकली नाही; 4 मिनिटे 38 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये यशचा स्टारडमही फिका पडला

यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चा ट्रेलर आज 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या ट्रेलरमध्ये यश अत्यंत धोकादायक गँगस्टर अवतारात दिसतो. चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि तो 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये…

Read More

जुहूमध्ये लुटमारीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाचा खून:स्वयंपाक्याच्या कटाचा पर्दाफाश, 5 आरोपी अटकेत; व्यापाऱ्याचे कुटुंब संपवण्याचा होता प्लॅन

मुंबईतील जुहू परिसरात एका रहिवासी इमारतीमधील व्यावसायिकाला लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोजकुमार अयोध्या यादव (वय 38) असे या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आरोपींनी मनोजकुमारला मारहाण करून त्याचा गळा आवळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे….

Read More

नवे लेबर कोड वेठबिगारी वाढवतील:'आयटक'ची टीका; अमरावतीत 10 ऑगस्टला 'जेल भरो' आंदोलन, श्याम काळे यांचे आवाहन

अमरावती: केंद्र सरकारने लागू केलेले चार नवे ‘लेबर कोड’ हे वेठबिगारी वाढवणारे असून, यामुळे शासकीय आणि कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी टीका ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी केली आहे. या नव्या कायद्यांमुळे केवळ खाजगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कामगारांनी याविरोधात संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. या…

Read More