डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ‘ठिगळ’; पालिकेची तात्पुरती मलमपट्टी:रस्त्यांची तांत्रिक पाहणी करून दर्जेदार कामांची मागणी
शहरातील प्रमुख मार्गांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीकडे अखेर अकोट नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिले आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत २ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची तात्पुरती कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ठिगळ लावून करण्यात आलेली ही मलमपट्टी किती दिवस टिकणार, असा…