Headlines

गणवेश तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे चक्क कपडेच कापले!:नुकसान भरपाईची मागणी राहुरीतील 9 केंद्रांतील शाळांत प्रकार; पालक-शिक्षकांत संताप‎

गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचे चांगले गणवेश कापून नमुने घेतल्याचा गंभीर आरोप राहुरी तालुक्यात समोर आला आहे. उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या अंगावरील गणवेशातूनच कापडाचे नमुने घेतल्याचे सांगितले जात असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील नऊ केंद्रांमधील शाळांमध्ये हा प्रकार घडल्याची चर्चा असून पालक व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गणवेश पुरवठादाराने यापूर्वीच कापडाचे नमुने…

Read More

पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलण्याची तयारी:नीलेकणी टास्क फोर्सने मागवल्या जनतेकडून सूचना; 13 सप्टेंबरपर्यंत मुदत

केंद्र सरकारच्या 6 सदस्यीय उच्चाधिकार टास्क फोर्सने सार्वजनिक परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि नागरिक संघटनांकडूनही मते मागवण्यात आली आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील ही टास्क फोर्स विशेषतः एनटीएच्या परीक्षांचे संचालन, सुरक्षा, परीक्षा रचना आणि व्यवस्थेतील सुधारणांवर काम करत आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या मते, टास्क फोर्सचे…

Read More

‘कांतारा’ थाटात अवतरला वराहदेव:मार्कंडेय शोभायात्रेत भूतकोला नृत्याचा थरार; एलईडी दृश्यांनी नगरकर मंत्रमुग्ध‎

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत श्री एकदंत गणेश मित्र मंडळ आणि शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या भूतकोला नृत्याने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘कांतारा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कर्नाटकातील पारंपरिक लोककलेच्या धर्तीवर वराह रूपम, गुलिगा देव आणि भूतकोला नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दहा कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे मिरवणुकीला थरारक आणि अद्भुत स्वरूप…

Read More

रामदेव यांनी रक्षाबंधना निमित्त कंगनाला पाठवले मिठाई-पैसे:म्हणाले- वाद मिटवा; कंगना म्हणाली- सणाला चुकभूल माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

रक्षाबंधनानिमित्त योगगुरु बाबा रामदेव यांनी अभिनेत्री तथा खासदार कंगना रनोट यांना मिठाई आणि भेटवस्तू पाठवली. त्यांनी एका लिफाफ्यात 500 रुपयांच्या नोटांची गड्डीही पाठवली. यावेळी रामदेव म्हणाले की, नात्यांमध्ये गोडवा कायम राहिला पाहिजे आणि जुने मतभेद विसरून प्रेमाने पुढे गेले पाहिजे. रामदेव म्हणाले की, देशात कोणत्याही कारणाने द्वेष आणि एकमेकांबद्दल वैरभाव नसावा. ते म्हणाले की, गेल्या…

Read More

सोनई, बेलवंडीत गुटखा विक्रेत्यांवर छापे:89 हजार रुपयांचा माल जप्त

सोनई आणि बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने २७ ऑगस्ट रोजी अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर ५ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण ८९ हजार ३६६ रुपये किमतीचा गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून ८ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शब्बीर महेताब सय्यद (वय ४५, रा. सोनई, ता….

Read More

‘रिल’च्या जमान्यात भक्तीगीतांतून संस्कारांची सुरेल वाट!:अहमदनगर एज्युकेशनच्या ‘भक्ती सुमन’ स्पर्धेत 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

भक्ती म्हणजे केवळ देवाचे नामस्मरण नसून मनात चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी शक्ती आहे. हीच भक्ती सुंदर स्वरातून व्यक्त झाली की त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. विद्यार्थ्यांना भक्तीगीतांच्या माध्यमातून संस्कृती, संत परंपरा आणि अध्यात्मिक वारशाशी जोडण्याचे काम या स्पर्धेतून झाले, असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. अहमदनगर…

Read More

Odisha Flood Crisis & UP Rain Alert; Weather Forecast India 2026

नवी दिल्ली/भोपाळ/लखनऊ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपी, बिहारसह देशातील 4 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील 47 शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये 67,000 हून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत, तर हवामान विभागाने शुक्रवारी राज्याच्या उत्तर आणि किनारी भागांमध्ये 2 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू…

Read More

मार्कंडेय रथोत्सवाने अहिल्यानगर शहर दुमदुमले:पद्मशाली संस्कृतीचा जागर; शोभायात्रेत कोलावू, फुगडी, लेझीम, टिपरी अन् मल्लखांबाची प्रात्यक्षिके‎

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाच्या वतीने श्री मार्कंडेय रथोत्सव पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी मैदान येथील ऐतिहासिक श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर ‘मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात’ शोभायात्रेला प्रारंभ झाला. सजवलेल्या रथात मार्कंडेय महामुनींची पालखी तसेच महादेवाच्या पिंडीला कवटाळून बसलेल्या…

Read More

नाशिक-पुणे रेल्वेच्या शिर्डी मार्गाला "राज' मान्यता:रेल्वे मंत्रालयाचे राजपत्र जारी, संगमनेरऐवजी नव्या मार्गाची निश्चिती‎

उत्तर-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या बहुचर्चित नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी भारत सरकारच्या ६ ऑगस्टच्या राजपत्रामध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. विशेष म्हणजे ६ ऑगस्टलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली व ६० दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले. एकीकडे अधिसूचना तर दुसरीकडे समिती, यावरून सध्या…

Read More

ॲड. रियाज पठाण खून प्रकरण:सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, पुरावे न मिळवता‎ आल्याने पाच निर्दोष‎

नेवासे येथील ॲड. रियाज पठाण खून खटल्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी निकाल देत सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. १६ सप्टेंबर २०१३ रोजी नेवासे तहसीलच्या आवारात ॲड. पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. १३ वर्षानंतर या खटल्याचा निकाल आला. खटल्यात सरकार पक्षातर्फे…

Read More