परिचारिकांचे काम बंद,रुग्णालयाबाहेर निदर्शने:सुधारित सेवा प्रवेश नियम,पदोन्नतीसाठी आंदोलन
सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित, न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली मंगळवारी, ४ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला ओ देत येथील परिचारिकांनी दोन तास काम बंद ठेऊन त्या-त्या रुग्णालयात निदर्शने केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी, क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३०…