मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश
मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला कल्याणचा 28 वर्षीय तरुण अभिषेक घोणे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले असून, त्यात कल्याण-डोंबिवलीतील एकूण चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अभिषेकचा मागील तीन दिवसांपासून कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही….