Headlines

OBC Reservation Warning; Babanrao Taywade Supports Chhagan Bhujbal

आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांना चर्चासाठी बोलवले जाते पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी उपसमितीचे सदस्य, कॅबिनेट मंत्री जातात तरी सुद्धा तोडगा निघत नाही, सरकारने यावर योग्य पाऊल उचलले पाहिजे, असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. . बबनराव तायवाडे म्हणाले की, आमच्या संघटनेशी मिळती जुळती भूमिका जे घेईल आम्ही त्यांच्यासोबत राहू म्हणून छगन भुजबळ यांनी मांडलेली…

Read Full News

Salman Khan Cameo in Arhaan Khan Bollywood Debut

20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान लवकरच नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान आपल्या भाच्याच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थातच, चित्रपटात सलमानच्या उपस्थितीमुळे अरहानच्या पदार्पणाला मोठे पाठबळ मिळू शकते. मात्र, सलमान खानने आपल्या कुटुंबातील सदस्याच्या करिअरला पाठिंबा देण्यासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याची ही पहिलीच…

Read Full News

पुण्यात कलम 144 कशासाठी?:विद्यार्थ्यांच्या मोर्चाला घाबरताय का?; रोहित पवारांचा सरकारला आणि पुणे पोलिसांना खडा सवाल

पुणे पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी एमपीएससी (MPSC) पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूंबाबत मोठे दावे करत सरकारला धारेवर धरले. कलम 144 ची…

Read Full News

रामायणच्या मेकर्सनी जन्माष्टमीला रावणाचे पोस्टर शेअर केले:टीका झाली; ही मेकर्सची प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे का? नकारात्मक प्रसिद्धीमुळे कसा फायदा-तोटा होतो

रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी रावणाचे पोस्टर शेअर केले, ज्यामुळे त्यांची जोरदार टीका होत आहे. काही युजर्स या चुकीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींचे मत आहे की चर्चेत येण्यासाठी निर्माते जाणूनबुजून अशा चुका करतात. प्रश्न असा आहे की, जर निर्माते जाणूनबुजून अशी चूक करत असतील, तर नकारात्मक प्रसिद्धीमुळे त्यांना काय फायदा मिळेल?…

Read Full News

Gold Silver Price Drop | India Market Update 2026

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 4,694 रुपयांनी घसरून 1.55 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी सुमारे 1.60 लाख रुपयांवर होता. तर चांदी 2.44 लाख रुपये प्रति किलोवरून घसरून 2.35 लाख…

Read Full News

न्यायमूर्ती भुईया म्हणाले- आंदोलकांवरील पोलिसांची कारवाई अत्यंत दुःखद:पोलिसांचे वर्तन बदलणे आवश्यक; कोठडीतील मृत्यू आणि बनावट चकमकी गंभीर गुन्हे

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध पोलिसांच्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जेव्हा आयपीएस अधिकारी स्वतः आंदोलकांवर हल्ला करताना दिसतात, तेव्हा ते अत्यंत दुःखद आहे.’ निवृत्त आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद यांच्या ‘पोलिसिंग द रिपब्लिक’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्यांनी हे विधान केले. न्यायमूर्ती भुईया म्हणाले, ‘पोलिसांकडून ज्या निष्पक्षतेची अपेक्षा केली जाते, ती…

Read Full News

नागपुरात डीजे बंदीचा फज्जा!:पोलिसांच्या उपस्थितीतच दहीहंडीला लेझर आणि डीजेचा दणदणाट; भाजप नेत्यांमध्येच जुंपली

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात डीजेवरील बंदीच्या आदेशावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घातले असतानाही बडकस चौकात दहीहंडी उत्सवासाठी डीजे वाजवण्यात आल्याचे समोर आले आहे. डीजेचा आवाज तुलनेने कमी ठेवण्यात आला असला, तरी बंदी असताना डीजेचा वापर झाल्याने पोलिसांच्या…

Read Full News

मोदींचा प्रश्न- जनतेशी कसे बोलावे, टिप्स द्या:शिक्षिकेचे उत्तर- कॉन्फिडन्स हवा; पंतप्रधानांची राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 48 शिक्षकांशी संवाद साधला. या शिक्षकांना आजच हा पुरस्कार दिला जाईल. पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनलवर 5 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. त्यात पंतप्रधानांनी एका महिला शिक्षिकेला विचारले की, तुम्ही मुलांना पब्लिक स्पीकिंग शिकवता. मी तुमच्याकडचा विद्यार्थी असेन आणि मला एक चांगला वक्ता बनायचे असेल,…

Read Full News

दर 6 महिन्यांनी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची घोषणा; छत्रपती संभाजीनगर दुर्घटनेनंतर सरकारचा निर्णय

राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करता यावी, यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे नियमित अग्निसुरक्षा परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 4 दिवसांत ही कार्यपद्धती जारी केली जाणार असून, त्यानंतर दर 6 महिन्यांनी रुग्णालयांमधील…

Read Full News

Sanjay Raut Toxic Test Allegation; Pune DJ Ban & MPSC Row Controversy

पुण्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बापट यांच्या भूमिकेला पुणेकरांचा पाठिंबा असल्याचा . राऊत म्हणाले की, सध्या मुख्य प्रश्न डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा आहे. हा आवाज भूकंपासारखे हादरे देणारा असल्याची टीका त्यांनी केली….

Read Full News