कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत निष्पक्ष तपासाची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी, संभाषणातील आवाजांची ओळख पटवावी आणि क्लिपमध्ये कोणत्याही प्रकारचा…