महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये:4,500 रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टींचा इशारा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा ऊस उत्पादकांना किमान 4,500 रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे….