Headlines

जुहूत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार?:तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्याची माहिती; चालकासह तिघे जखमी झाल्याचा दावा

मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी अचानक गोळीबार केल्याचे वृत्त दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या कथित हल्ल्याचे नेमके…

Read Full News

जम्मूमध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीवर हेरगिरीचा आरोप:चीनशी संबंधित लोकांसह विदेशी गुप्तचर एजंटांच्या संपर्कात होती, FIR दाखल

जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्करातील एका अधिकाऱ्याच्या पत्नीविरुद्ध परदेशी गुप्तचर एजंट्ससाठी संवेदनशील माहिती गोळा करून ती शेअर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत सूत्रांनुसार, या महिलेवर चीनशी संबंधित व्यक्तींसह परदेशी गुप्तचर एजंट्सशी कथित संपर्क असल्याचा आरोप आहे. पोलिस महिला करत असलेल्या संशोधनाशी संबंधित हालचाली आणि परदेशी संस्थांशी तिच्या संभाव्य संपर्काची चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, शुक्रवारी जम्मूच्या…

Read Full News

Kiren Rijiju Statement on India Politics; India Not Bangladesh or France

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी आरोप केला की, फ्रान्स आणि बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसक घटनांसारखे षड्यंत्र भारतातही रचले गेले होते. काही नेत्यांनी तरुणांना भडकवण्याचा आणि रस्त्यांवर हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला. रिजिजू यांनी सांगितले की, असे धोकादायक षड्यंत्र रचणारे लोक हे विसरले की भारत ना बांगलादेश आहे, ना फ्रान्स. भारतात सत्ताबदल…

Read Full News

सातारा-पुणे महामार्गावरील 1 कोटी 55 लाखांचा दरोडा 12 तासांत उघड:कुरिअरमधील कर्मचाऱ्यानेच दिली लुटीची माहिती, आठ आरोपी जेरबंद

सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत कुरिअर पिकअपमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटल्याची घटना उघडकीस आली होती. या दरोड्याचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत छडा लावत आठ आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1 कोटी 55 लाख 27 हजार 258 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कुरिअर…

Read Full News

पुणे शिक्षक मतदारसंघात महादेव जानकरांची मोठी घोषणा:दत्तात्रय सावंतांना रासपचा पाठिंबा, विजयाचा दावा

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना पक्षाचा अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या दत्तात्रय सावंत यांना आता रासपचा पाठिंबा मिळाला आहे. जानकर यांनी सावंत…

Read Full News

अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात:पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी, पत्नी शिक्षिका असल्याचे सांगत मांडले प्रश्न

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरले आहेत. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न आपण जवळून जाणून घेतले असून, निवडणूक लढवणे हा आपला अधिकार आहे, असे बिचुकले यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आपली पत्नी शिक्षिका असून…

Read Full News

सरकार बदलण्याच्या घोषणांवर कंगनांचा टोला:फ्रान्समधील हिंसाचार आणि वर्ल्ड वॉरच्या वातावरणात PM मोदी आवश्यक; कोलकाता चेंगराचेंगरीबद्दल व्यक्त केला शोक

भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी रविवारी विरोधकांच्या सरकार बदलण्याच्या वक्तव्यांवरून टोला लगावला. रायपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, विरोधकांच्या हीन दर्जाच्या कारवाया देशाला वारंवार आठवण करून देत आहेत की भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. कंगना यांनी फ्रान्समध्ये झालेल्या हिंसाचाराचा आणि तिसऱ्या महायुद्धाच्या घोंघावणाऱ्या धोक्याचा दाखला देत म्हटले की, सध्याच्या जागतिक…

Read Full News

संविधानाला धक्का लागला, तर बहुजनांचे हक्क धोक्यात येतील:लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी एकजुटीने लढा उभारा, विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

भारतीय संविधान, लोकशाही व्यवस्था आणि बहुजन समाजाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि निर्भीडपणे संघर्ष केला पाहिजे. सत्ता येईल आणि जाईल, मात्र संविधानाने दिलेली मूल्ये, सामाजिक न्याय आणि सामान्य नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. संविधान हेच बहुजन समाजाच्या हक्कांचे आणि भविष्याचे सुरक्षा कवच आहे. या कवचाला धक्का लागला, तर सामान्य माणसाचे अधिकार…

Read Full News

Fix Low CIBIL Score After Loan Repayment; Step-by-Step Guide 2026

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जर तुम्ही तुमच्या कर्जाचे सर्व हप्ते पूर्णपणे फेडले असतील आणि बँकेकडून नो-ड्यूज सर्टिफिकेट (NOC) देखील मिळाले असेल, तरीही तुमच्या सिबिल अहवालात ते कर्ज ‘ॲक्टिव्ह’ किंवा थकीत दिसत असेल, तर सावध व्हा. जेव्हा तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँका सर्वप्रथम तुमचा क्रेडिट अहवाल तपासतात. जुन्या कर्जाचा उल्लेख अहवालात खुले कर्ज…

Read Full News

कर्णपुरा देवी मंदिरात हजारो महिलांनी केला दुर्गा सप्तशती पाठ:अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्राकडून 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राने दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन केले होते. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी कर्णपुरा देवी मंदिर संस्थान येथे हा पाठ हजारो महिलांच्या सहभागातून उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमात हजारो महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आदिशक्ती माता जगदंबेच्या भक्तिमय वातावरणात महिलांनी श्रद्धापूर्वक दुर्गा सप्तशतीचे पठण केले. सामूहिक…

Read Full News