Headlines

पुण्यात इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर जागतिक मंथन:‘इएलटीआय’ची आंतरराष्ट्रीय परिषद 7 ते 10 ऑक्टोबरला; एआय, एनईपी 2020 वर चर्चा

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, बहुभाषिक शिक्षण आणि बदलत्या अध्यापन पद्धतींच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषा व साहित्य शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन होणार आहे. भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इएलटीआय’ची २० वी आंतरराष्ट्रीय व ५६ वी वार्षिक परिषद ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आली…

Read Full News

‘माणसासकट सगळं जाळून टाकेन’:वाल्मीक कराडसोबत संवादाचा दावा असलेल्या सुग्रीव कराडचा जुना VIDEO व्हायरल, टोल नाक्यावर तरुणाला धमकी

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती. या क्लिपमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यात संवाद झाल्याचा दावा सोनवणे यांनी केला होता. वाल्मीक कराड तुरुंगातून बाहेर असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून कट रचत…

Read Full News

राजकीय वादात रश्मी वहिनींना ओढल्यास रस्त्यावर उतरू!:ठाण्यातील 'शूटर गँग' ते मतदार यादीतील SIR घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकर आक्रमक

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, या वादात वारंवार रश्मी ठाकरे यांचे नाव ओढण्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. “खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर कोणाचा आक्षेप असेल, तर त्याचे उत्तर राऊतांना द्यावे. ज्यांचा…

Read Full News

Chhagan Bhujbal Statement On Maharashtra Drought; MPSC & Thackeray Protest

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, पावसाअभावी मदतीपासून वंचित राहिलेले तालुके आणि मंडळांचा नव्याने विचार करण्याची मागणी यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प् . मुख्यमंत्री आणि महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. “एखादा तालुका जास्त आला तरी चालेल, पण कोणावर अन्याय होता…

Read Full News

Dnyanesh Kumar Resignation Demand; Left Parties Protest At Jantar Mantar

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील जंतर-मंतरजवळ शनिवारी AISA आणि डाव्या संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केली. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यापूर्वी शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान 1,000 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, काल मुंबईत CJP नेही SIR…

Read Full News

Maharashtra Monsoon Withdrawal Update; Mumbai Weather Forecast 2026

राज्यात यंदा पावसाचा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महा . हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. मुंबईसह इतर काही भागांतही मान्सूनचा परतीचा प्रवास…

Read Full News

कळमनुरी गोळीबार आणि खून प्रकरण:16 जणांवर 'मकोका'; हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई

कळमनुरी येथील जूने बसस्थानक भागात गोळीबार करून खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या 16 जणांवर मकोका लावण्यात आला असून या प्रकरणात आता कलम वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक एन. एस. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. एकाच वेळी 16 जणांवर करण्यात आलेली ही कारवाई हिंगोली पोलीस दलाच्या इतिहासातील मोठी कारवाई…

Read Full News

यूपीमधील सर्वात उंच इमारतीच्या 43व्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी:शरीराचे तुकडे-तुकडे झाले, 30-40 फूट दूर जाऊन पडला

नोएडामध्ये एका तरुणाने शनिवारी उत्तर प्रदेशातील सर्वात उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने 68 मजली इमारतीच्या 43व्या मजल्यावरून उडी घेतली. जमिनीवर पडताच त्याच्या शरीराचे तुकडे झाले. शरीराचे तुकडे 30-40 फूट दूरपर्यंत विखुरले. सर्वत्र रक्तच रक्त पसरले. ही घटना सेक्टर-94 मधील सुपरनोव्हा सोसायटीच्या अस्पायर टॉवरमध्ये घडली. घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात संभव जैन (29)…

Read Full News

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या

शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज…

Read Full News

‘चुट्टामल्ले’च्या मॉर्फ्ड व्हिडिओवर संतापला ज्युनियर NTR:म्हणाला- महिलांना देवी मानणाऱ्या देशात AI च्या माध्यमातून अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही

दक्षिणात्य अभिनेता ज्युनियर NTR त्यांच्या ‘देवरा: पार्ट 1’ चित्रपटातील ‘चुट्टामल्ले’ गाण्याच्या AI च्या मदतीने तयार केलेल्या मॉर्फ्ड व्हिडिओवरून संतापले. हे गाणे जान्हवी कपूरसोबत चित्रित करण्यात आले होते. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “हे अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद आणि निंदनीय आहे. ज्या देशात महिलांचा आई आणि देवी म्हणून सन्मान केला जातो आणि ‘मातृदेवो भव’ हा आपल्या संस्कृतीचा भाग…

Read Full News