मराठी साहित्याचा जागर!:नाशिकच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे आयोजन; 30 जुलैपर्यंत प्रवेशिकांचे आवाहन
मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करून ते समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी नाशिकच्या अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने द्विवार्षिक राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी दिली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दर दोन वर्षांनी आठ वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख ₹३,०००…