हिंगोलीत मसोड फाटा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला:गळफास की घातपात? पोलिसांचा तपास सुरू
कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा शिवारात ढोलक्याचीवाडी येथील तरुणाचा मृतदेह (मंगळवारी ता. १४) दुपारी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. कळमनुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील…