Headlines

नागपुरात 7 महिन्यांत 851 महिलांवर अत्याचार:गुन्हेगारी वाढली; पळवून नेलेल्या 356 पैकी 331 मुलांचा लागला शोध

नागपूर शहरात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै 2026) शहरात महिला अत्याचाराच्या 851 घटनांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, बालकांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई करत पळवून नेलेल्या 356 मुलांपैकी 331 मुलांचा शोध घेतला आहे. ही आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीतून नागपूर पोलिस…

Read More

पुण्यात बेकायदा पिस्तुलातून सुटली गोळी सुटल्याने सराईत गुन्हेगार रुग्णालयात:एकाला अटक तर साथीदारावर गुन्हा दाखल

पुण्यातील धनकवडी परिसरात बेकायदा पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने एक तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश मोरे (रा. धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा…

Read More

पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू:हडपसर कचरा डेपोत कंत्राटी कामगाराला ट्रकने उडवले, तर पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार ठार

हडपसरमधील काळेपडळ भागात पुणे महापालिकेच्या कचरा डेपोत एका सफाई कामगाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव सुनील हनुमंत गुरव (वय 27, रा. बसवकल्याण, कर्नाटक) आहे. दिनेश श्रीमंत राठोड (वय 36, रा. कलबर्गी, कर्नाटक) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी…

Read More

Supriya Sule Leads NCP Protest at CSMT Against Rising Inflation

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य स . सीएसएमटी परिसरात झालेल्या आंदोलनात पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘महागाई की मार नहीं चलेगी’ अशा…

Read More

Laxman Hake Criticizes Maratha Reservation Impact on OBC Rights in Maharashtra

आमचे 27 टक्के आरक्षण हे सामाजिक मागासांचे असून ते प्रतिनिधित्वासाठी आहे. परंतु, कारखानदार बोगस प्रमाणपत्रे काढून ही संधीच हिरावून घेत असतील, तर आरक्षण वाचले असे कसे म्हणायचे? असा संतप्त सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याचसोबत त्यांनी राष . लक्ष्मण हाके म्हणाले की, बबनराव तायवाडे उन्ह खात वृद्ध झाले आहेत का? ते नक्की…

Read More

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला हायकोर्टात आव्हान:आरोपींना नोटीस, दोन दशकांनंतरच्या लढ्याला नवे वळण

काँग्रेसचे तत्कालीन नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात निंबाळकर कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले होते. आता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अपिलाची उच्च न्यायालयाने दखल घेत सर्व…

Read More

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालणार:मुख्यमंत्री फडणवीसांचे ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले असून, या सर्व प्रश्नांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी ‘अमृत महामंडळ’ आणि ‘परशुराम…

Read More

जयपूरच्या प्राणीसंग्रहालयात वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू:गवत कापायला गेली होती, सहकाऱ्यांचा दावा- कोणीतरी जाणूनबुजून पिंजऱ्याचे गेट उघडले

जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये (प्राणीसंग्रहालय) टायगर शिवाजीच्या हल्ल्यात एका मजूर महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी 9 वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मजूर महिला सुगना देवी टायगरच्या एन्क्लोजरमध्ये (कुंपण/वाडा) गवत कापण्यासाठी आत शिरली होती. सोबतच्या महिलांचा दावा आहे की टायगर त्यावेळी एन्क्लोजरमध्ये पिंजऱ्यात होता. आम्ही आत शिरताच कोणीतरी पिंजऱ्याचे गेट उघडले. याच दरम्यान टायगरने आमच्यावर…

Read More

Dhiraj Deshmukh Demands Cloud Seeding In Marathwada Amid Drought Crisis

मराठवाड्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी राज्य सरकारने केवळ पावसाची प्रतीक्षा न करता उपलब्ध वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा वाप . धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सरकारचे लक्ष मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीकडे वेधले. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असून अनेक…

Read More

चांदी 2 दिवसांत ₹9000 ने घसरली:सोनं ₹4,500 स्वस्त झालं, पंतप्रधान मोदींच्या अनावश्यक सोनं न खरेदी करण्याच्या आवाहनाचा परिणाम

आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,855 रुपयांनी घसरून 1.51 लाख रुपये झाला आहे. तर, आज एक किलो चांदीची किंमत 2,059 रुपयांनी घसरून 2.28 लाख रुपयांवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे अवघ्या 2 दिवसांत चांदी 9,000 रुपयांनी…

Read More