Headlines

कोंडाईबारी घाटात भीषण अपघात!:ब्रेक फेल झालेला केमिकल टँकर कारवर उलटून एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणारे केमिकल घेऊन गुजरातच्या दिशेने जाणारा टँकर अनियंत्रित होऊन कारवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील सोनगड येथील शकीलभाई कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…

Read More

स्पॉटलाईट ते बिझनेस वुमन:कृष्णा श्रॉफने स्वतःच्या हिमतीवर उभारले 'MMA' चे साम्राज्य

कृष्णा श्रॉफची एक अशी ओळख आहे जी प्रेक्षकांना स्पॉटलाईटच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. अभिनयाच्या सोबतीने क्रीडा व्यवसायात तिच्या नावाच्या चर्चा या कायम ऐकायला मिळतात. फिटनेस आयकॉन त्यानंतर एक नव्हे तर 3 अत्यंत स्पर्धात्मक रिअॅलिटी शो खातरों के खिलाडी, छोरिया चली गाव आणि द 50 मध्ये बाजी मारणारी रिअॅलिटी टीव्ही स्पर्धक आणि त्यासोबतच नेहमीच उबदार हास्याने…

Read More

आईच्या नावावरील जमीन विकली म्हणून संताप:वृद्ध आई-वडिलांना मुलांची मारहाण, VIDEO व्हायरल

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन्ही मुलांनी आई-वडिलांना रस्त्यावरच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Read More

पुनर्विकासासाठी 'रीडेव्हलपमेंट गुरु' व्हॉट्सॲप सेवा सुरू:एआयच्या मदतीने किचकट प्रक्रिया सोपी होणार, सभासदांना मिळेल अचूक माहिती

पुणे शहरातील जुन्या निवासी इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. ड्रीम्स रीडेव्हलपमेंटचे संस्थापक सीए एस लक्ष्मीनारायण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही सेवा गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि विकासक यांच्यात दुवा म्हणून काम करेल, ज्यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल. लक्ष्मीनारायण…

Read More

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का!:जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द, पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणार आहे. पालघरच्या जात पडताळणी समितीने त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवले होते, ज्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा फटका मानला जात आहे. राऊत यांनी दादरमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या…

Read More

गणेश विसर्जनातील साउंड सिस्टिम बंदीवर पुनर्विचार करा: असोसिएशनची मागणी:'चार टॉप-चार बेस मान्य, पण स्थानिक रोजगारावर परिणाम होत आहे'

गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवरील बंदी आणि निर्बंधांबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी पुणे जिल्हा साउंड व लाईट जनरेटर असोसिएशनने केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी पत्रकार परिषदेत हे मत मांडले. काळभोर म्हणाले की, राजकीय, लग्न, हळदीचे कार्यक्रम तसेच इतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाजवली जाणारी गाणी हा आमचा व्यवसाय आहे. साउंड सिस्टिमवर आधारित…

Read More

बॉस स्कॅमद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्याची 2.20 कोटींची फसवणूक:बनावट व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर मालकाचा फोटो वापरून विश्वास संपादन; तिघांना अटक

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका नामांकित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे बनावट व्हॉट्सअ‍ॅप खाते तयार करून कंपनीतील कर्मचाऱ्याची २ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर कंपनीच्या मालकाचा फोटो आणि नाव वापरून कर्मचाऱ्याचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक केली, असे पोलीस तपासात समोर…

Read More

नेपाळ पूर दुर्घटनेतील बेपत्ता महाराष्ट्रीयांच्या शोधासाठी मोहीम:अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हाती घेतली; शासनाला सहकार्याची विनंती

नेपाळमधील नुकत्याच झालेल्या पूर दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरने (एमएमआरसीसी) राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही या संस्थेने केली आहे. या मोहिमेअंतर्गत, महासंघाचे जिल्हानिहाय समन्वयक स्थानिक कुटुंबांपर्यंत पोहोचून बेपत्ता नागरिकांची माहिती गोळा करतील. नेपाळ…

Read More

राममंदिर ट्रस्टची बैठक सुरू, 3 नवीन विश्वस्तांची घोषणा:यामध्ये अशोक सिंघल यांच्या नातेवाईकांचे नाव, माजी IPS राजेश पांडे CEO बनू शकतात

अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची तिसरी बैठक होत आहे. यात ट्रस्टच्या 3 नवीन विश्वस्तांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्यांदाच एका महिलेचाही समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचे महेश भागचंदका, अयोध्या येथील वकील मदन मोहन पांडे आणि RSS शी संबंधित शिकोहाबादच्या निर्मला यादव यांना विश्वस्त बनवण्यात आले आहे….

Read More

नागपुरात 10 लाखांचा 20 किलो गांजा जप्त:पाचपावली पोलिसांनी 4 आरोपींना पकडले, एक जण फरार

नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई सुरूच ठेवली आहे. पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतून १० लाख २८ हजार रुपये किमतीचा तब्बल २० किलो ५८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान वाहने आणि मोबाईलसह एकूण १८ लाख…

Read More