Headlines

धरणांतील पाणी शेतीसाठी बंद!:उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांचे आदेश, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक भागांमध्ये शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Read More

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच नेवासा बुद्रुक तीर्थक्षेत्रातील उपस्थित १६ जावयांचा विशेष सत्कार करून त्यांच्या हस्ते धोंड्याची पूजा करण्यात आली. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजी…

Read More

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

'माळीण' दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर!:'एक होतं माळीण' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच; 24 जुलैला होणार प्रदर्शित

३० जुलै २०१४… पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाने असा काही कहर केला की, अवघ्या काही मिनिटांत एक संपूर्ण हसतं-खेळतं गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत १५० हून अधिक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा थरार आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाच्या माध्यमातून…

Read More

खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी या मागण्यांसाठी शुक्रवारी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या….

Read More

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा…

Read More

विभक्त कुटुंबे अन् एकलपालक मुलांना बनवून देताहेत मित्र:शहरांत भरू लागलेत मैत्रीचे वर्ग, यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतोय

शहरांमध्ये विभक्त कुटुंबे आणि एकच मूल असलेल्या कुटुंबांची संख्या वेगाने वाढली आहे. ज्याने मुलांच्या संगोपनाची पद्धतही बदलली आहे. मुलांना त्यांच्या समवयस्क मुलांसोबत मिसळण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन देशातील अनेक शहरांमध्ये ‘मैत्रीचे वर्ग’ भरू लागले आहेत. याला प्ले डेट्स म्हटले जात आहे. यात पालक मुलांना त्यांच्याच वयाच्या इतर मुलांची ओळख करून देतात. यामुळे मित्रांची कमतरता व…

Read More

कारखाना कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी| डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपासून साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. अशाच परिस्थितीत तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळाली. मृत बाळासाहेब तारडे…

Read More

रोडीजमध्ये अभिजीत दीपकेला शिवीगाळ केली नाही:माजी जज रघु राम यांनी व्हायरल व्हिडिओला फेक सांगितले, म्हटले- मी त्यांना कधीच भेटलो नाही

टीव्ही शो रोडीजचे माजी जज रघु राम यांनी व्हायरल होत असलेल्या एका जुन्या ऑडिशन व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की व्हिडिओमध्ये ज्या तरुणाला रघु राम ओरडताना आणि अपशब्द वापरताना दिसत आहेत, ते कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आहेत. रघु राम यांनी एक व्हिडिओ जारी…

Read More