Headlines

एमआयटी-एडीटीने 'स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची स्थापना केली:बी.टेक एआय अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू; उद्योगाभिमुख शिक्षणावर भर

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एसओएआय) स्थापनेची घोषणा केली आहे. या नव्या स्कूलद्वारे नैतिक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ घडविण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण) आणि बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा विज्ञान) या अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू झाले आहेत. ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल…

Read More

डॉ. राजीव पोतदार यांना भाजपाची उमेदवारी:काँग्रेस बॅकफूटवर, अतुल लोंढे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली असताना, महाविकास आघाडीने अखेरच्या क्षणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या जागेसाठी भाजपने माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या…

Read More

पुणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण झालेल्या बालिकेची 16 तासांत सुटका:बंडगार्डन पोलिसांची कारवाई, तीन आरोपी जेरबंद

पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवानी अमोल भोसले (वय २१, व्यवसाय: मजुरी, रा. मलठण, ता. शिरूर,…

Read More

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला विरोध:भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो देवस्थानांचे रणशिंग

भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. देवस्थानांच्या जमिनी वाचल्या तरच मंदिरे आणि धर्मकार्य सुरक्षित राहील, असे सांगत सरकारने जमिनी अधिग्रहित करण्याचे काम तात्काळ थांबवावे, असा इशारा या देवस्थानांनी दिला आहे. मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात या कायद्याविरोधात महत्त्वपूर्ण…

Read More

विधान परिषद निवडणुकीत विदर्भात बंडखोरी; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह:महायुती-मविआत धुसफूस, उमेदवारांचे भवितव्य गुप्त डावपेचांवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद, बंडखोरी आणि शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ संख्याबळाची राहिलेली नाही, तर ती अंतर्गत राजकारणाची बनली आहे. अमरावतीमध्ये शिंदे गटाची बंडखोरी,…

Read More

लाडकी बहीण योजनेत 81 लाख अपात्र लाभार्थी:दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वसुली करा, काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८१ लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नावे नुकतीच वगळण्यात आली असून, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीपूर्वी अपात्र अर्जदारांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटप करून राज्याच्या तिजोरीची लूट करणाऱ्या संबंधित मंत्रालयातील सचिव आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून राज्याचा बुडालेला पैसा…

Read More

डेक्कन क्वीनचा पुणे स्थानकावर 97 वा वाढदिवस साजरा:पुणे-मुंबईला जोडणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रेल्वेचे जंगी स्वागत

पुणे-मुंबईला जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेचा 97 वा वाढदिवस सोमवारी (1 जून) पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवस सोहळ्याचे नियोजन रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांनी केक कापून हा दिवस साजरा केला. सकाळी सव्वा…

Read More

पुणे विधानपरिषद:विक्रम काकडे NCPचे अधिकृत उमेदवार; दिलीप वळसे पाटील म्हणाले – कोर कमिटीचा निर्णय अंतिम, नाराजी दूर करू

पुणे, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यासोबत सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, राजकारणाची समीकरणे नेहमी बदलत असतात. पक्षाच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय अंतिम आहे. आता पक्षाची…

Read More

RSS शताब्दीनिमित्त पुण्यात शॉर्ट फिल्म, रील स्पर्धा:दीड लाखांची बक्षिसे, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने ‘पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते. मिलिंद लेले यांनी सांगितले की, येत्या…

Read More

अन्नामलाई भाजप नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना:नवीन पक्षाच्या चर्चांवर बोलले- दोन दिवसांनी बोलू; भाजपचा झेंडा नसलेल्या गाडीत दिसले

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई सोमवारी दिल्लीला रवाना झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, ते भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यांच्या नवीन राजकीय पक्ष स्थापनेच्या चर्चा सुरू असतानाच हा दौरा होत आहे. चेन्नई विमानतळावर त्यांना भाजप सोडण्याबद्दल आणि नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले – ‘वाट बघा. दोन दिवसांनी बसून बोलूया.’…

Read More