Headlines

मुंब्रा पोलिसांचे ‘मिशन 48 तास’, सलग 2 दिवस अहोरात्र मोहीम:सुगावा नसताना 948 सीसीटीव्ही फुटेज पाहून 6 पथकांनी लावला सातवर्षीय चिमुरडीचा शोध

कोणताही तांत्रिक पुरावा नाही, मोबाइल लोकेशन नाही की तपासाचा ठोस धागा नाही… अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मुंब्रा पोलिसांनी केवळ ४८ तासांत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले आहे. दिवा परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीचा पोलिसांनी बदलापूर येथे शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. ठाणे ते बदलापूरदरम्यानच्या तब्बल ९४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासून…

Read More

ऋषिकेश जैस्वालांना शिवीगाळ; शिवसैनिकांचा एकाला चोप:शहागंजमध्ये अतिक्रमण कारवाईवरून राडा

शहागंज भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जोरदार राडा झाला. मनपाचे पथक कारवाई करत असताना अचानक काही हातगाडी चालक आणि दुकानदार आक्रमक झाले. त्यांनी पथकावर धावून जात थेट संघर्षाची भूमिका घेतली. या गोंधळात संतप्त व्यापाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनाही या व्यापाऱ्यांनी लक्ष्य करत शिवीगाळ केली. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा…

Read More

कॉक्राेच जनता पार्टीचे दीपके दिल्लीमध्ये निदर्शने करणार:परीक्षा वाद – शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सोशल मीडियावर व्यंग्यात्मक मोहिमेने चर्चेत आलेल्या ‘कॉक्राेच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके शनिवार, ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार आहेत. भारतात आल्यानंतर ते नीट-यूजी, सीबीएसई, सीयूईटी व इतर परीक्षांतील वादांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके म्हणाले – नोकरी सोडली, अटकेची भीतीही बोस्टनमध्ये जनसंपर्काचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर…

Read More

मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरचे न्या. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने १ जून रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे रिक्त पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम २२३…

Read More

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More

काॅर्पोरेट जिहाद; मतीनसहघरमालक हनीफची चाैकशी:निदा खानने आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ म्हणाला, मतीनने घर कुणाला दिले माहिती नाही

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अाश्रय दिल्याप्रकरणी साेमवारी पुन्हा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हनीफ शेख यांची विशेष पथकाकडून तपासणी झाली. ‘मतीन भाई ने घर की चाबी मांगी थी, मुझे मालूम नहीं किसको घर दिया’ असा जबाब हनीफने दिला. मात्र त्याच्याच घरात निदा खानने वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला…

Read More

Tiffany Trump Ambanis Guest at Vantara, Jamnagar; Donald Trump Daughter Visits Gujarat

Marathi News National Tiffany Trump Ambanis Guest At Vantara, Jamnagar; Donald Trump Daughter Visits Gujarat जामनगर4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धाकटी मुलगी टिफनी ट्रम्प पती मायकल बोलोस यांच्यासोबत सोमवारी दुपारी गुजरातमधील जामनगर येथे पोहोचल्या. येथे त्या अंबानी कुटुंबाच्या पाहुण्या असतील. टिफनी रिलायन्सच्या वनताराला भेट देऊन रात्र येथेच घालवतील. यापूर्वी, रविवारी संध्याकाळी…

Read More

तुकाराम मुंढे पॅटर्नचा धडाका:'मिसलीडिंग' जाहिराती देणारे ब्रँड आणि कलाकार रडारवर, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल

आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत मुंढे यांनी अवैध गुटखा आणि भेसळखोरांविरुद्ध मोहिमेचा धडाका लावला असून, आता त्यांचा मोर्चा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींकडे वळला आहे. ब्रँडच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने…

Read More

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More

अमरावती विधान परिषद:महायुतीत फूट, दोन उमेदवार रिंगणात; भाजपचे प्रवीण पोटे, शिंदे सेनेचे विप्लव बाजोरिया आमने-सामने

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीमधील मतभेद उघड झाले आहेत. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी महायुतीमधील घटक पक्ष…

Read More