गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय
जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद…