Headlines

बिबट्याच्या दहशतीतून पळताना 11 वर्षीय कृष्णाचा तळ्यात पडून मृत्यू:जवळे कडलगमधील ‎हृदयद्रावक घटना‎

बिबट्याच्या भीतीने जीव वाचवताना शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या मुलाचा शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरात घडली. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा सायंकाळी घराजवळ असताना त्याला बिबट्या दिसला….

Read More

7 लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात!, पिकांची वाढ खुंटली:उत्पादन घटण्याची भीती; 16 लाख पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पावसाची नोंद झाली. अर्थात अपवाद वगळता ऑगस्ट कोरडाच राहिला. त्यामुळे खरिपातील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. जिल्हाभरात सुमारे ७.९ लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी झाली. प . जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग,…

Read More

यूपीच्या चर्चित IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा:IIT-IIM उत्तीर्ण, लंडनची नोकरी सोडून अधिकारी बनल्या होत्या, पती देखील IAS

यूपीच्या प्रसिद्ध आयएएस दिव्या मित्तल यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सध्या त्या महसूल विभागात विशेष सचिव होत्या. त्या म्हणाल्या – “आज कृतज्ञतेने डोळे पाणावले आहेत. फक्त एकच दृश्य त्यात वसले आहे. पद आज सुटले, पण स्वप्न सुटणार नाही, जे या देशाच्या मातीने मला दिले आहे.” सूत्रांनुसार, दिव्या मित्तल यांनी मुख्य सचिव एस.पी. गोयल यांच्याकडे…

Read More

प्रशासन गावाच्या दारी:देवडेमधील मुक्कामात अभिजित पाटलांचा वीज, रस्ते, पाणी प्रश्नांवर शेतकऱ्यांशी संवाद

‘आमदार मुक्कामी, आपल्या गावी’ या अभिनव अभियानांतर्गत माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी देवडे (ता. पंढरपूर) येथे मुक्काम करून गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. गावातील अडीअडचणी जाणून घेतानाच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवून अनेक प्रलंबित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच दारात आल्याने या उपक्रमाला देवडे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवडेतील बैठकीला…

Read More

अक्कलकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार:सकल मराठा समाजाकडून आमदार कल्याणशेट्टींचा सत्कार‎

अक्कलकोट येथील राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर केला. याबद्दल अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नेहरू गल्ली येथील आमदार कार्यालयात सत्कार संपन्न झाला. जय भवानी.. जय शिवराय.. च्या जयघोषात आमदार कार्यालयाचा परिसर दुमदुमून…

Read More

व्हीएमव्हीकडे ‘जीएमसी’ची वक्रदृष्टी; होस्टेलसाठी केली इमारतीची मागणी:माजी विद्यार्थी संघटनेसह ‘एआयएसएफ’ने केला विरोध, संचालकांना दिले निवेदन‎

ऐतिहासिक इमारतीमुळे अजरामर झालेल्या शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (पूर्वीचे व्हीएमव्ही) इमारतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही. त्यामुळे जीएमसीने व्हीएमव्हीकडे वक्रदृष्टी फिरविली आहे. होस्टेलसाठी तात्पुरत्या स्वरूपात व्हीएमव्हीची इमारत द्यावी, अशी मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस:12 सप्टेंबरला मराठा समाजाची बैठक, मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्याचा इशारा, विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. पहाटे ३ वाजेपर्यंतही आंदोलकांची ये-जा सुरू होती. अनेक आंदोलकांनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला असून, पुढील काही दिवस अंतरवालीत थांबण्याची तयारी…

Read More

ओबीसींना मोठा झटका:1 सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

ओबीसी समाजाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी विविध कारणे नमूद करत आंदोलनास परवानगी देण्यास नकार दिला आहे. रुग्णालये आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास आझाद…

Read More

आत्मनिर्भर भारतसाठी युवक सृदृृढ हवा:शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्त भारत अभियान; दत्ता पाकिरे यांचे प्रतिपादन‎

सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री शिवाजी विद्यालय, शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त भारत अभियान’अंतर्गत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर देशाचा युवक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे. त्यासाठी तो व्यसनमुक्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा…

Read More

नेपाळच्या पुरात रायसेनचे 2 युवक बेपत्ता:मानसरोवर यात्रेतून परतलेले ओम म्हणाले- मृत्यूला जवळून पाहिले, ज्या हॉटेलात थांबलो होतो, ते उद्ध्वस्त

नेपाळमधील रसुवागढी येथे आलेल्या पूर आणि भूस्खलनाने तो परिसर उद्ध्वस्त केला, जिथे अवघ्या दोन दिवसांपूर्वी रीवाचे ओम द्विवेदी उपस्थित होते. कैलाश मानसरोवर यात्रेतून परतलेल्या ओम यांनी सांगितले की, ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, ज्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण केले होते आणि ज्या इमिग्रेशन सेंटरमध्ये त्यांनी तपासणी केली होती, तिथे आता ढिगारा आणि पाणी आहे. ओम म्हणाले-…

Read More