Headlines

माढ्यात 550 जणांची तपासणी, 250 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार:सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन‎

. माढा तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनरावजी शिंदे शुगर अँन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५२१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात सौंदणे येथील ६१ वर्षीय संजय गोडसे यांनी १५० वे रक्तदान केले. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिक, कार्यकर्ते तसेच कारखाना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने…

Read More

मोहोळ शहरामध्ये अतिक्रमण मोहीम:रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत‎

शहर परिसरातील हायवेसह शहरात येणाऱ्या रस्त्यांवरती गेली, अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम मोहोळ पोलिस स्टेशन नॅशनल हायवे व नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरूच असून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण काढल्याने शहरात येणारे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ पोलिस ठाणे व मोहोळ नगरपरिषद प्रशासन यांच्या अतिक्रमण पथकाने गुरुवार दि २७…

Read More

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका; किराणा मालाच्या दरात वाढ:वस्तूंचे दर वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले; खोबरे, खाद्यतेलाचा समावेश‎

मागील पंधरा दिवसांपासून किराणा मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. खोबरे, खाद्यतेल, डाळी, गूळ, शेंगदाण्यांबरोबरच ड्रायफ्रूटसह दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर वाढल्याने महिन् . सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने ऑगस्ट अखेरपर्यंत दांडी मारली आहे. समाधान कारक एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके…

Read More

भागवत म्हणाले- भारताच्या DNA मध्येच एकता-विविधता:आपण वेगळे, पण एकमेकांशी जोडलेले, चुकीची विचारसरणी माणसाला प्राण्यांजवळ नेते

आरएसएस (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये शनिवारी रात्री 42 मिनिटे भाषण दिले. ते म्हणाले की, एकता आणि विविधता भारताच्या डीएनए (DNA) मध्ये आहे. लोक वेगवेगळे दिसतात, त्यांच्या राहण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण सर्वांमध्ये एक नैसर्गिक संबंध आहे. भागवत म्हणाले – विविधतेत एकता ही भारताची पारंपरिक विचारसरणी आहे आणि देश वेळोवेळी संपूर्ण…

Read More

साखर-तेल-मैदा महागले; 1 तारखेपासून ‘पाव’ही महागला, अहिल्यानगर शहरात‎पाव लादीच्या दरात वाढ‎

वाढत्या महागाईचा फटका आता बेकरी व्यवसायालाही बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. बेकरी उत्पादनांसाठी आवश्यक तेल, साखर आणि मैद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने शहरातील बेकरी व्यावसायिकांनी पाव लादीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील बेकरी व्यावसायिकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत १ सप्टेंबरपासून पाव लादीचा होलसेल…

Read More

कन्नड येथील रस्त्यांना अडथळा ‎ठरणारे खांब हटवण्याची मागणी‎:शिवसेना गटनेते व नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांची महावितरणकडे मागणी

कन्नड शहरातील विविध वसाहतींमध्ये अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले असले तरी, अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागीच ठेवण्यात आले आहेत. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून रस्ते असूनही नागरिकांना त्यांचा वापर करता येत नाही. हे अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने हटवावेत, अशी मागणी शिवसेना गटनेते व नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांनी महावितरणकडे केली आहे. शहरातील विकासकामांचा आढावा…

Read More

गवळीशिवरा येथील महारुद्र‎मारुतीला पावसासाठी साकडे‎:तिसऱ्या शनिवारी दोन लाख भाविकांनी महारुद्र मारुतीचे घेतले दर्शन

नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील महारुद्र मारुती मंदिरात तिसऱ्या श्रावणी शनिवारी श्रद्धेचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंतातूर झालेल्या शेतकरी राजासह तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी महारुद्राच्या चरणी हजेरी लावत ‘चांगला पाऊस पडू दे आणि शेती पिकू दे’, असे साकडे घातले. पहाटेपासूनच मंदिराच्या आवारात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या….

Read More

यंदा गणेशमूर्तींच्या दरात 10 टक्के वाढ:अर्ध्या ते 7 फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यास राजस्थानचे कलाकार‎

लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पैठण शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे. बाप्पांच्या विविध आणि आकर्षक रूपांना आकार देण्यासाठी राजस्थानातील उदयपूर येथील कुशल मूर्तिकारांचे पथक पैठणमध्ये दाखल असून, सध्या दिवस-रात्र मूर्ती घडवण्याची आणि रंगवण्याची लगबग सुरू आहे. मात्र, यंदा रंग, कच्चा माल, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च, मेहनताना वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत दहा टक्के…

Read More

ओव्हरटेकच्या चढाओढीमध्ये दोन‎दुचाकींचा अपघातात:तरुणाचा मृत्यू‎, खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना, मृत युवक चिखली येथील

खुलताबाद येथे दर्शनासाठी शुक्रवारी रात्री हजारो भाविक येत असताना संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर दोन स्पोर्ट बाइकस्वारांच्या ओव्हरटेकच्या चढाओढीत अपघात झाला. यात एका दुचाकीवरील ताबा सुटल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय अजय ठेंग (१८, रा. शहापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. विजय हा (एमएच २० एचएम ३९९७) बाइकवरून खुलताबादच्या दिशेने येत होता. सोबत आणखी…

Read More

घातक केमिकलचा मुख्य सूत्रधार जेरबंद:इस्तेकार खानला नेपाळ सीमेलगत अटक‎

घातक रासायनिक केमिकल व पावडरची अवैध विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (३८, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टरमाईंडचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पळशी, फर्दापूर, आळंद, शिवूर, तोंडापूर परिसरात आढळलेल्या रासायनिक ड्रम्सपासून या तपासाला…

Read More