Headlines

विद्यार्थ्यांची सुरक्षा बसचालकांची जबाबदारी:गणूरच्या होरायझन अकॅडमीत आरटीओ अमोल पवार यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर चालक आणि वाहकांचीही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय बस चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेकिंग टाळावे आणि मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ती खबरदारी घेत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मालेगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमोल पवार यांनी केले. मविप्र संचलित गणूर येथील…

Read More

कीर्तन सप्ताहाने मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो:मानूरला संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुरूदेव महाराजांचा उपदेश‎

भगवंताची अंतःकरणापासून भक्ती करणारे आणि वारकरी संतांचा ध्यास बाळगणाऱ्या वैष्णवांची भेट म्हणजेच आयुष्याचे सार्थक होय. अशा संतजनांच्या आलिंगनाने मानवी जन्म सुफळ होतो. कीर्तन सप्ताहाने आपापसातील मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो, असा उपदेश ह.भ.प. गुरुदेव महाराज यांनी केला. मानूर येथे कीर्तन सप्ताहात, दादाजी जगन्नाथ बोरसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष कीर्तनसेवेत ते बोलत होते….

Read More

कंगनाशी संबंधित प्रश्नावर तापसी पन्नू भडकली:म्हणाली- तुम्ही प्रश्न विचारणे बंद कराल, तेव्हाच वाद संपेल; कंगनाने 'स्वस्त कॉपी' म्हटले होते

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कंगना रनौतशी संबंधित प्रश्न विचारल्यावर भडकली. अलीकडेच कंगनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे तापसीवर तिच्या संगोपनाची आणि आई-वडिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला होता. यावर मीडियाशी बोलताना तापसी म्हणाली की, जेव्हा लोक आणि मीडिया तिला या मुद्द्यावर प्रश्न विचारणे थांबवतील, तेव्हा हा वाद आपोआप संपेल. तापसी तिच्या आगामी चित्रपट ‘गांधारी’च्या प्रमोशनच्या निमित्ताने बोलत होती….

Read More

विद्यार्थिनींनी जवानांसाठी विणला मायेचा धागा‎:प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी गुंफला जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर‎

देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांप्रती आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या घरातील भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशीही आपले भावनिक नाते…

Read More

निफाडमध्ये 1,527 ‎पुस्तक संचांचा तुटवडा‎:अडीच महिने उलटूनही पूर्ण संच उपलब्ध नाहीत‎

निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचा अद्याप पूर्ण पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ उलटला असून, तालुक्यात तब्बल १,५२७ पुस्तक संचांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके उपलब्ध न झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रश्नाबाबत…

Read More

अमित शहा म्हणाले- देश काही धर्मशाळा नाही:देशात फक्त नागरिकांनाच राहण्याचा अधिकार, घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी धोका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, हा देश काही धर्मशाळा नाही. देशात राहण्याचा अधिकार केवळ येथील जनतेलाच आहे. शहा यांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजीज (NSS) परिषदेत सांगितले- घुसखोर देशाच्या सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांसाठी धोकादायक आहेत. अतिशय कमी वेळेत देशाला घुसखोरांपासून मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या आठ…

Read More

जायखेडा ग्रामपंचायतीच्या 5 वर्षातील कारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत:ग्रामविकास अधिकाऱ्याचा तात्पुरता कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे‎

ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत उपोषणकर्ते बापूजी मोगरे यांच्या मागण्या आणि तक्रारींची दखल घेत पंचायत समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. चौकशीच्या काळात ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत राहावे, या उद्देशाने ग्रामविकास अ . गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी स्वतंत्र आदेश काढून ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्याकडील ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा तात्पुरता कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज…

Read More

जॉनी लिव्हरच्या मुलीच्या लग्नाच्या फेक बातम्या:गोविंदाच्या मुलासोबत AI व्हिडिओ व्हायरल; जेमी, यशवर्धनला म्हणाली धाकटा भाऊ

जॉनी लिव्हर यांची मुलगी आणि अभिनेत्री जेमी लिव्हर यांनी सांगितले की, तिच्या लग्नाच्या बातम्या खोट्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे एक बनावट AI व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यात दावा करण्यात आला होता की, जेमी आणि गोविंदाचा मुलगा यशवर्धन यांचे लग्न झाले आहे. व्हिडिओत दोघांच्या लग्नाशी संबंधित AI व्हिज्युअल देखील दाखवण्यात आले होते. त्यानंतर जेमीने सोमवारी…

Read More

सप्तशृंगीनगरात बिबट्याची दहशत‎:वणी परिसरातील घटनास्थळी पावलांचे ठसे, वन विभागाकडून पाहणी

शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळून आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सप्तशृंगीनगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकत होते….

Read More

गिरणेचा पूर ओसरूनही जुनी बेजमधील नुकसानीचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष:संरक्षण भिंत बांधण्यासह भरपाई रक्कम देण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

जून व जुलै महिन्यात कळवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूर व पुनद प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीला पूर आला. या पुरामुळे जुनी बेज शिवारातील नदीलगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, पिकांचे नुकसान झाले आहे. सिमेंट . या प्रश्नावर जुनी बेजचे सरपंच सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली….

Read More