Headlines

दुसरा श्रावणी शनिवार:भद्रा मारुतीचे 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन‎, खुलताबादला दर्शनास 1 तास, पहिल्या शनिवारपेक्षा एक लाख भाविक वाढले‎

श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३० तासांत पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या शनिवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते; परंतु दुसऱ्या शनिवारी भाविकांच्या संख्येत एक लाखांची वाढ झाली आहे. या गर्दीमुळे खुलताबाद नगरीला यात्रेचे स्वरूप आ ल्याचे संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील…

Read More

कानडगावच्या शाळा कामासाठी मंदिरामधील दानपेटी केली खुली:ग्रामस्थांचा पुढाकार, 26 हजारांचा निधी शाळेच्या रंगरंगोटीसाठी सुपूर्द‎

तालुक्यातील कानडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत सटवाई देवीच्या मंदिराची दानपेटी उघडून त्यातील जमा रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासकामांसाठी सुपूर्द केली. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत चार वर्गखोल्य . या खोल्यांची रंगरंगोटी करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी बोलक्या भिंती तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. शाळा प्रशासनाने लोकसहभागाचे…

Read More

पावसाने दडी मारल्याने कडेठाण परिसरातील शेतकरी हवालदिल:विहिरी कोरड्या पडल्या, खरीप पिकांची वाढ खुंटून किडीचा प्रादुर्भाव वाढला‎

पैठण तालुक्यातील कडेठाण व परिसरात पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी नदी, नाले व तलाव कोरडे ठाक पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी देणे आणि घरातील दागदागिने गहाण ठेवून पेरणी केली…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धरणांत 74% पाणी साठा, सप्टेंबर कोरडा गेल्यास शेती, उद्योग संकटात

महाराष्ट्राला एल निनोचा परिणाम जाणवणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील धरणांत ऑगस्टपासून पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये ६.१४% पाणी कमी आहे. विशेष म्हणजे १ जून रोजी गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये ४.२८ टक्के पाणी कमी होते. पावसाळा पुढे सरकताना यंदाच्या व गेल्या वर्षीच्या जलसाठ्यात फरकही वाढत…

Read More

नांदेडमध्ये जावयाकडून खंजीरने वार करून सासूचा खून:पत्नीवर संशय, पत्नीही गंभीर जखमी, आरोपी फरार

पत्नीवर संशय घेऊन सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर धारदार खंजीरने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी नांदेड शहरातील शहीदपुरा भागात घडली. या हल्ल्यात आरोपीची पत्नीही गंभीर जखमी झाली असून, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. नांदेडमधील शहीदपुरा भागातील लकी सिंग गणपत सिंग मिलवाले (35) याचे पत्नी गुरुप्रीत कौर लकी सिंग मिलवाले (30) हिच्याशी काही…

Read More

चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून पुतण्याचा काका-काकूंवर गोळीबार:गोळी डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी, बीडमधील घटना

परळी तालुक्यातील खोडवासावरगाव तांडा येथे चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाने आपल्या काका, काकू आणि आजोबांवर बंदुकीतून अंधाधुंद 3 ते 4 गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या गोळीबारात गोळी डाव्या डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी…

Read More

सायरा बानो@82, दिलीप कुमारांशी लग्नाचे भविष्य ठरले खरे:पाहुण्यांनी चोरले काटे-चमचे; शाहरुखला मुलगा मानले; जाणून घ्या किस्से

वर्ष 1955 तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये ‘आझाद’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. याचवेळी चित्रपट निर्माता एस.एस. वासन यांनी दिलीप कुमार यांची भेट एका प्रसिद्ध ज्योतिष्याशी घडवून आणली. ज्योतिष्याने दिलीप कुमार यांचा चेहरा पाहिला, हातावरील रेषा वाचल्या आणि त्यांची कुंडली बनवली. यानंतर त्यांनी अशी भविष्यवाणी केली, जी ऐकून खुद्द दिलीप कुमारही थक्क झाले. ज्योतिष्याने सांगितले की दिलीप कुमार यांचे…

Read More

संभाजीनगरच्या तरुणीचा आईकडूनच 25 हजारांत साैदा:बनावट लग्नाचा डाव, नाशिकच्या बनावट मामाने नवरदेवाकडून उकळले 2 लाख

अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांत आईनेच मध्यस्थांच्या मदतीने पोटच्या मुलीचे खोटे नाव सांगून तिचे बनावट लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके (सर्व रा. नाशिक) आणि पीडितेची आई शीला (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आईने नाशिक शहरातील एका…

Read More

अंतर्गत मतभेद संपवून लोकांसमोर जा; पार्थ पवारांच्या नेत्यांना कानपिचक्या:शरद पवारांना भेटून 3 तास फक्त कौटुंबिक चर्चा केल्याचा दावा

पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पार्थ पवार यांच्या वरळीतील ‘शुभदा’ निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. त्यात “पक्षातील अंतर्गत . राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीला…

Read More

नोटीस मिळताच अमराठी भाषिकांचा कांगावा सुरू:ऑटोचालकांची रस्त्यावर ‘मराठी परीक्षा’

“महाराष्ट्रात राहून किती वर्षे झाली? थोडीफार मराठी बोलता येते का? किमान एक वाक्य तरी बोलून दाखवा…” मुंबईसह संपूर्ण एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) मधील रस्त्यांवर सध्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून परप्रांतीय ऑटो व टॅक्सीचालकांना थांबवून असे थेट व परखड प्रश्न विचारले जात आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास चालकांच्या हातात – “एका महिन्यात मराठी शिकून आरटीओ कार्यालयात हजर व्हा,…

Read More