Headlines

जिल्हा परिषद कन्या शाळेत देशभक्तीपर गीतांवर कवायती:शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक, सुविधांसाठी मदतीचे आश्वासन

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर अमरावती येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर आधारित उत्कृष्ट कवायती सादर केल्या. त्यांच्या लक्षवेधक सादरीकरणाचे शिक्षणमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख आणि जिल्हा…

Read More

डॉ. भारती पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड:म्हणाल्या- आता नव्या उमेदीने काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये 13 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल डॉ. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या नव्या जबाबदारीमुळे आता…

Read More

हाफकिन संस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा:राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. कदम यांनी उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांनी अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला, तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य…

Read More

41 महिलांना लघुउद्योगासाठी बिनव्याजी आर्थिक सहाय्य:रोटरी क्लब नागपूरचा घुईखेड परिसरात स्तुत्य उपक्रम

रोटरी क्लब नागपूरने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत घुईखेड व परिसरातील ४१ महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांची बिनव्याजी आर्थिक मदत पुरवण्यात आली. हा मदत वाटप कार्यक्रम घुईखेड येथील श्रीमती कमलाबाई टावरी इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडला. यावेळी निरजा शुकुल, रागिणी साहू,…

Read More

'माझ्या मुलाचे नाव आल्यास, मी स्वतः पोलिस ठाण्यात आणेल':विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 20 जून रोजी झालेल्या विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. जर या गुन्ह्यात आपल्या मुलाचा सहभाग असेल किंवा आरोपींच्या सीडीआर रिपोर्टमध्ये त्याचे कुठेही नाव आढळल्यास, आपण स्वतः त्याला पोलिस ठाण्यात…

Read More

गावंडगावच्या कस्तुराबाई मानकर यांचे देहदान:वैद्यकीय शिक्षणासाठी कुटुंबीयांनी घेतला आदर्श निर्णय

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या उपयोगी पडावे, या उदात्त विचाराने त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचे देहदान केले. या निर्णयामुळे मानकर कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. कस्तुराबाई मानकर यांनी हयात असतानाच श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या…

Read More

खल्लारवासियांचा दर्यापूर तहसीलसमोर विविध मागण्यांसाठी एल्गार:बससेवा, रस्ते, पाणी, स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर्यापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ॲड. धर्मेंद्र आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश कुरळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अनेक मागण्या नमूद केल्या आहेत. बस स्टँड ते खल्लार गावापर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा…

Read More

'मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा!':हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांचा संताप

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरविल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सोमवारी ता. १७ जिल्हाधिकारी यांच्या दलना समोर येऊन प्रचंड घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी कार्यालय दणाणून केले होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथील मातंग…

Read More

मंत्री दादाजी भुसे यांनी अमरावतीत दिल्या विविध शपथा:जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेसाठी नागरिकांना केले आवाहन

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अमरावती येथे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा (लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण) आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात ही शपथ घेण्यात आली, ज्यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. राज्य शासनाने जलसंधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, कारण भविष्यातील पाणीटंचाई लक्षात…

Read More

खड्डे, जलपर्णी, पूरस्थितीवर राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत आंदोलन:श्रीकांत पाटील यांचा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी मंजूर झालेले टेंडर आणि सिंहगड रोड परिसरातील पूरस्थितीच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) वतीने पुणे महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात पुणे महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या पुणे शहर…

Read More