Headlines

अमरावती विद्यापीठातील मेसमध्ये अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि दारूच्या बाटल्या:अभाविपने प्रशासनाचा निषेध करत कुलगुरूंना निवेदन दिले; कारवाईची मागणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आंदोलन केले. विद्यापीठाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्यानेही विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अभाविपच्या महानगर शाखेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read More

एसटीच्या NCMC कार्डमुळे प्रवाशांच्या सवलती बंद; राज्यभरात गोंधळ:ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसह इतरांना फटका; आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) लागू केले आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा तयारी न करता हा निर्णय घेतल्याने अमरावतीसह राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग आणि लहान मुलांना प्रवास दरात मिळणाऱ्या सवलती जवळपास बंद झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी हा निर्णय…

Read More

555 ग्रामपंचायतींवर आता विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त:माजी सरपंचांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होईपर्यंत हीच व्यवस्था

अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींसाठी आता विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ग्रामपंचायती प्रशासकांशिवाय होत्या. सरपंचांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे तेव्हापासूनच या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. या काळात शासनाने माजी सरपंचांना प्रशासकांचे…

Read More

नांदगाव खंडेश्वरच्या वाघोडा गावात 22 दात्यांनी रक्तदान केले:सामाजिक बांधिलकी जपली; छोट्या गावातून दिला रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावात युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत झालेल्या या शिबिरात २२ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला नागरिक आणि युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि गावातील नागरिकांनी…

Read More

नांदगाव तहसीलमध्ये अनेक पदे रिक्त:नायब तहसीलदार, एफएसआय, शिपायांसह मंडळ अधिकाऱ्यांचीही पदे रिकामी; नागरिकांची कामे रखडली

नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची दोन, अन्नधान्य निरीक्षकाचे (एफएसआय) एक आणि शिपायाची दोन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे निराधारांच्या मानधनासह सामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. या रिक्त पदांमध्ये निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आणि संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारांचा समावेश आहे. याशिवाय अन्नधान्य निरीक्षण अधिकाऱ्याचे एक पद आणि शिपायांच्या दोन जागाही रिकाम्या…

Read More

हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन होणार:उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नागरी व पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. हिंजवडी परिसरातील नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच ‘माण’ आणि मारुंजी परिसरातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा…

Read More

पालकांना बोलावल्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या!:तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले, सातारच्या वाय.सी कॉलेजच्या वस्तीगृहातील घटना

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या (अर्थात वाय. सी कॉलेज) विद्यार्थी वस्ती ग्रहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थी आत्महत्या केल्याच्या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना काल रात्री घडलेली आहे आज अभावीपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनी…

Read More

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी 'गेम चेंजर':एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, हामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष 'टास्क फोर्स'ची नियुक्ती

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मुंबईत देखील काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येईल याचं नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारा…

Read More

गणेशोत्सवात ध्वनी-प्रकाशाचा अतिरेक रोखा:सातारच्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांकडे मागणी, डीजेसह लेझर शोवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन

गणेशोत्सवाच्या उत्साहाला ध्वनी व प्रकाशाच्या अतिरेकाचे गालबोट लागू नये, यासाठी डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर लाईटवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. कै. डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फौंडेशन व सातारा समन्वय समितीच्या वतीने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवात मिरवणुका व विविध कार्यक्रमांदरम्यान ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर…

Read More

कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून समर्पित वृत्तीची प्रेरणा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रद्धांजली सभेत दिलीप क्षीरसागर यांचे गौरवोद्गार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी कै. केशवराव नांदेडकर यांच्या जीवनातून समर्पित वृत्तीने समाज आणि संघटन कार्यात सातत्याने कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मूळचे धुळे येथील आणि सध्या सिंहगड परिसरात राहणाऱ्या संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. केशवराव नांदेडकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी क्षीरसागर…

Read More