Headlines

पुण्यात राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचे महागाईविरोधात थाळीनाद आंदोलन:दैनंदिन वस्तू, शिक्षण, आरोग्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतींवरून सरकारला घेरले

देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या वतीने आज पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमती, महागडे शिक्षण, आरोग्यसेवेचा वाढता खर्च तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. या आंदोलनात सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या आंदोलन…

Read More

73 कोटींच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी अटकेत:नागपूर रेल्वे स्थानकातून 'ईओडब्ल्यू'ने केली कारवाई; बनावट कागदपत्रांनी उचलले होते कृषी कर्ज

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी सचिन खुशाल कारेमोरे (वय ४०, रा. नेरी, जि. भंडारा) याला अटक केली आहे. त्याने भारतीय स्टेट बँकेच्या मौदा आणि रामटेक शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे कृषी कर्ज उचलले होते. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकातून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना…

Read More

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू:पहिल्या 1.5 किमीसाठी 30 रुपये, रात्रीच्या प्रवासाला 25 टक्के अतिरिक्त भाडे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षांसाठी मंजूर केलेली भाडेवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास परवानगी देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पुणे व पिंपरी…

Read More

पन्हाळा हादरला! घराच्या दारातच वहिनीवर धारदार शस्त्राने 16 वार:उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी फरार

पन्हाळा तालुक्यातील काखे येथील शाहूनगर वसाहतीत भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घरात एकट्या असलेल्या पूजा दाभाडे यांच्यावर त्यांच्या चुलत दिराने धारदार शस्त्राने तब्बल 16 वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या पूजांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोपी फरार आहे. काखे (ता. पन्हाळा) येथील शाहूनगर वसाहतीमध्ये बुधवारी (दि. 2) दुपारी एकच्या सुमारास ही धक्कादायक…

Read More

बार्टी पीएचडी विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित:न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेले आंदोलन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर थांबवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी पुण्यात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. हे उपोषण न्याय्य हक्कांसाठी सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर सुरू होते. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला. बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे आणि जात पडताळणी विभागाचे उपायुक्त संजय कदम यांच्या…

Read More

साखर एका आठवड्यात ₹2.51 ने स्वस्त:किरकोळ किंमत ₹65.08 वरून ₹62.57 प्रति किलो, घाऊक भावही ₹60.39 वरून ₹57.62 किलोवर

देशात साखरेच्या किरकोळ किमती एका आठवड्यात 2.51 रुपयांनी घसरून 62.57 रुपये प्रति किलो झाल्या आहेत, ज्या 27 ऑगस्ट रोजी ₹65.08 प्रति किलो होत्या. अन्न मंत्रालयाच्या मते, त्याच्या सरासरी किरकोळ किमतीत 3.85% घट झाली आहे. केंद्र सरकारने 10 लाख टन साखर आयात करण्याची परवानगी दिल्यानंतर आणि डीलर्ससाठी साठा ठेवण्याचे नियम कडक केल्यानंतर किमती घसरल्या आहेत. तथापि,…

Read More

Virender Sehwag Praises Hanuman Ansh Movie

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीम करोली बाबा यांच्यावर आधारित ‘हनुमान अंश’ चित्रपट पाहिल्यानंतर, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग यांनी आपल्या मुलासोबत चित्रपट पाहण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. सहवाग यांच्या प्रतिक्रियेमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक डॉ. विशाल चतुर्वेदी भावुक झाले. त्याचबरोबर चतुर्वेदी यांनी सांगितले की, त्यांना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही हा चित्रपट पाहावा असे…

Read More

मुलीच्या वक्तव्यानंतर तेलंगणा मंत्री बडतर्फ:CM रेवंत रेड्डी यांच्यावर ₹200 कोटींच्या जमीन हडपल्याचा आरोप केला होता

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी राज्यमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यांच्या मुलीने मुख्यमंत्री आणि इतर काँग्रेस नेत्यांविरोधात केलेल्या विधानांमुळे वाढलेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेखा यांची मुलगी सुष्मिता पटेल यांनी मुख्यमंत्री आणि अनेक काँग्रेस नेत्यांवर ₹200 कोटींच्या जमिनीच्या वसुलीचा आरोप केला होता. अधिकृत निवेदनानुसार, सुरेखा यांना हटवण्याची शिफारस गुरुवारीच…

Read More

गंगापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का:अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट शिंदे गटात, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बालवयापासून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नंदनवन निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार संदिपान भुमरे…

Read More

नागपुरात आत्मसमर्पीत नक्षली भूपतींच्या नियुक्तीला विरोध:गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक पदावर नियुक्ती; जन संघर्ष समितीने फेरविचाराची मागणी केली

गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांची गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला नागपूरच्या ‘जन संघर्ष समिती’ने कडाडून विरोध केला आहे. समितीने म्हटले आहे की, आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, महत्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय पदावर जबाबदारी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या भूतकाळातील प्रकरणांची आणि…

Read More