ध्वनिप्रदूषणावर बोलणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, धमकी:महाराष्ट्र अंनिसकडून तीव्र निषेध, पोलिसांना कठोर कारवाईची मागणी
पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र निषेध केला आहे. बापट हे ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा नाही. तो नागरिकांचे…