Headlines

SIR मुळे ‘सर’ व्यग्र; निरक्षरांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जुंपणार:सोलापूर मनपाचा फतवा; 1.82 लाख विद्यार्थी 7,205 निरक्षर शोधून काढणार

मतदार याद्या फेरसर्वेक्षणाचे (एसआयआर) काम सध्या जोरात सुरू असून सोलापूर शहरातील शिक्षक या कामांत व्यग्र आहेत. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील ७ हजार २०५ निरक्षरांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने मनपाला आदेश दिले आहेत. आता हे टार्गेटही पूर्ण करण्यासाठी सर . आपल्या घरातील, नातेवाईकांमधील, शेजारी अथवा परिसरातील १५ वर्षांवरील लिहिता- वाचता न येणाऱ्या व्यक्तींची माहिती या विद्यार्थ्यांनी…

Read More

‘समृद्धी’वरील लुटारूला दिल्लीमध्ये सेकंड हँड गाडी खरेदी करताना अटक:उद्योजकाला लुटणाऱ्यांपैकी दोघांना दिल्लीत तर तिघांना बीड-येवल्यातून अटक

समृद्धी महामार्गावर राहुरीच्या तरुण उद्योजकाला अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड व त्याच्या चार साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तब्बल ५ जिल्ह्यांत हवा असलेला आणि एमपीडीएमध्ये फरार असलेला परशुराम स्वतःच्या गाड्यां . लुटमारीनंतर गाड्यांच्या ॲक्सेसरीज व सेकंड हँड गाड्या खरेदी करण्यासाठी तो थेट दिल्लीच्या ऑटोमोबाइल मार्केटमध्ये पोहोचला होता, तेथेच एलसीबीने त्याच्या मुसक्या आवळल्या….

Read More

जमीन विकल्याने वृद्ध आई-वडिलांना रस्त्यात मारहाण:इंदापूरमध्ये दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात अडवून काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यात घडला. ६५ वर्षीय वडील पत्नीसमवेत रस्त्यावर फिरण्यासाठी गेले असताना कारमधून आलेल्या दोन्ही मुलांनी त्यांना अडवले. त्यानंतर आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून वाद घालत दोघांनीही आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारानंतर तुकाराम…

Read More

माघाठाण्यात रंगणार 'मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी'चा थरार:मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटणार हंडी

मुंबईतील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बोरीवलीतील माघाठाणे येथे भव्य ‘मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि युवासेना सचिव राज सुर्वे यांच्या पुढाकाराने, शिवसेना व तारामती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मराठी…

Read More

डफरीन रुग्णालयातील अग्निकांडात दोषी कोण, हा प्रश्न कायम:तीन नवजात बालकांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजूनही शासनाकडे नाही

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) एसएनआयसीयूमध्ये २२ ऑगस्ट रोजी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. मात्र, या समितीचा अहवाल अजूनही शासनाला सादर झालेला नाही. सूत्रांनुसार, अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तो गुरुवारी सादर होईल की नाही, हे सांगणे…

Read More

'पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही':प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही मनोज जरांगे भूमिकेवर ठाम; आरक्षणाबाबत सरकारच्या मोठ्या घोषणा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत जाहीरपणे सकारात्मकता दर्शवली. मात्र, या आश्वासनानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम राहिले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “किमान चार प्रमाणपत्र…

Read More

पुणे गृहनिर्माण मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता:मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) घरांसाठी उत्पन्न निकषांमध्ये शिथिलता आणली आहे. अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांना उत्पन्नाचा पुरावा…

Read More

बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी मंत्री शिरसाठ यांची चर्चा:मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; उपोषण मागे घेण्याची विनंती केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी १४ वा दिवस होता. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले असून, आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आंदोलनाच्या १४ व्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या शासकीय निवासस्थानी…

Read More

'दिव्य मराठी' इम्पॅक्ट:आधार व वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाच्या तफावतीची परिवहन विभागाकडून गंभीर दखल

आधार कार्डवरील नाव आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील (स्मार्ट कार्ड) नावात तफावत असल्याने वाहन हस्तांतरण, नाहरकत प्रमाणपत्रासह विविध कामे ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात दिव्य मराठीने २ सप्टेंबर रोजी ठळकपणे वृत्त प्रकाशित करून परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर परिवहन विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले…

Read More

गणेशोत्सवात यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल:पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या पुरस्कार सोहळ्यात ही अपेक्षा व्यक्त केली.

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ नवभारत विकास फाउंडेशनला दिला. ही संस्था दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय व कॅलीपर्स मोफत बसवते. याशिवाय, समाजोपयोगी काम करणाऱ्या एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वरनगर आणि अभिनव कलाभारती यांना ‘सेवाव्रत गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा स.प. महाविद्यालयाच्या लेडी…

Read More