बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी मंत्री शिरसाठ यांची चर्चा:मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; उपोषण मागे घेण्याची विनंती केली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी १४ वा दिवस होता. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले असून, आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आंदोलनाच्या १४ व्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या शासकीय निवासस्थानी…