सातारा जिल्ह्यात शाळा आणि आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट:विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश
शाळांच्या भौतिक सुविधांपासून प्राथमिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून, तब्बल ३२४ कोटी रुपयांच्या निधीतून २०९ प्राथमिक शाळा आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यात येणार आहे. या कामांना आता अधिक वेग देऊन निर्धारित कालमर्यादेत ती पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात…