'पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही':प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही मनोज जरांगे भूमिकेवर ठाम; आरक्षणाबाबत सरकारच्या मोठ्या घोषणा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत जाहीरपणे सकारात्मकता दर्शवली. मात्र, या आश्वासनानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम राहिले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “किमान चार प्रमाणपत्र…