Headlines

दर्यापुरात अवैध सावकारीवर सहकार विभागाची धाड:पाच पथकांनी तीन ठिकाणांहून कोरे धनादेश, स्टॅम्पसह संशयास्पद दस्तऐवज जप्त केले

दर्यापूर शहर आणि परिसरात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाविरोधात सहकार विभागाने कारवाई केली आहे. बुधवारी, २ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांनी पाच पथके तयार केली. या पथकांनी एकाच वेळी पाच वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडींमध्ये तीन ठिकाणांहून संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. दर्यापूर येथील सहायक निबंधक कार्यालयाकडे गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या होत्या….

Read More

पुण्यात डीजेवरून वाद पेटला!:विद्यानंद बापटांवर 'नक्षली'चा आरोप, गुन्हा दाखल करण्याची शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींची मागणी

पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बैठकीनंतर विद्यानंद बापट हे नाव चर्चेत आले असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण नास्तिक असल्याचे स्पष्ट करत, प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याची भूमिका बापट यांनी मांडली आहे. मात्र, त्यांच्या…

Read More

सातारा जिल्ह्यात शाळा आणि आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट:विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

शाळांच्या भौतिक सुविधांपासून प्राथमिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून, तब्बल ३२४ कोटी रुपयांच्या निधीतून २०९ प्राथमिक शाळा आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यात येणार आहे. या कामांना आता अधिक वेग देऊन निर्धारित कालमर्यादेत ती पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात…

Read More

लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या:अमरावती जिल्हा न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, एकाची निर्दोष मुक्तता

कौटुंबिक वादातून लाकडी दांडक्याने मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तताही करण्यात आली. आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव गोपाल उर्फ गोलू रामदास शिंदे (२७, दसरा मैदान, अमरावती) असे आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी राजू लक्ष्मण शिंदे (४२) याची…

Read More

भाववाढ आणि टंचाईमुळे साखरेला ‘स्टॉक लिमीट’ लागू:साठेबाजांवर अंकुश, तपासणी सुरु झाल्याने पीडीएसची डोकेदुखी वाढली

अमरावती जिल्ह्यात वाढती महागाई आणि साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे ‘स्टॉक लिमीट’ (साठेबाजीवर अंकुश) लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची कामे वाढली असून, ठोक विक्रेत्यांकडील साठा दररोज मोजला जात आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक ठोक विक्रेत्याला एका महिन्यात ४ हजार क्विंटल साखरेची विक्री करण्याची मुभा आहे. यापेक्षा जास्त साठा आढळल्यास संबंधितांवर १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार…

Read More

काँग्रेसने राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात आंदोलन केले:हल्दवानी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन दिले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी या निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले. हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी…

Read More

विद्यार्थ्यांच्या भूतबाधेचे भय घालवण्यासाठी कलेक्टर, एसपींचा आश्रमशाळेत मुक्काम:आदिवासींचा लढवय्या इतिहास सांगितला; सीईओ, प्रकल्प अधिकारीही सोबत होते

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी मुक्काम केला. भूतबाधेच्या भीतीने काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केले होते. ही भीती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी आणि मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी…

Read More

शिक्षा:65 वर्षांच्या वृद्धाला तीन वर्षांचा सश्रम कारावास चिमुकलीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सहा वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज, बुधवार २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर झाला. किशोर…

Read More

नांदेड जिल्ह्यात पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’:93 सराईत गुन्हेगारांची तपासणी; 122 मपोका अन्वये दोन गुन्हे दाखल, 57 समन्स व 37 वॉरंट बजावले

नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून सराईत गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच संशयित व्यक्तींची सखोल तपासणी केली. या कारवाईत ९३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून, पाहिजे व फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार १…

Read More

जरांगे पाटलांच्या भाषेवर विनोद पाटलांची उघड नाराजी:म्हणाले- भाषा चुकीची असेल तर ती चुकीचीच, महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावर मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जरांगे यांच्या भाषेबाबत नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा…

Read More