भाववाढ आणि टंचाईमुळे साखरेला ‘स्टॉक लिमीट’ लागू:साठेबाजांवर अंकुश, तपासणी सुरु झाल्याने पीडीएसची डोकेदुखी वाढली
अमरावती जिल्ह्यात वाढती महागाई आणि साखरेच्या कमी पुरवठ्यामुळे ‘स्टॉक लिमीट’ (साठेबाजीवर अंकुश) लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची कामे वाढली असून, ठोक विक्रेत्यांकडील साठा दररोज मोजला जात आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक ठोक विक्रेत्याला एका महिन्यात ४ हजार क्विंटल साखरेची विक्री करण्याची मुभा आहे. यापेक्षा जास्त साठा आढळल्यास संबंधितांवर १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार…