तांदुळवाडी ते घोडेगाव रस्ता; ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू:1 सप्टेंबरपासून रस्त्यावरच उपोषण, प्रशासनाचे दुर्लक्ष
गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी ते घोडेगाव आणि डोमेगाव रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ सप्टेंबरपासून रस्त्यावरच बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाला दिलेल्या मुदतीत काहीही हालचाल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला आहे. घोडेगाव ते तांदुळवाडी या ५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण होऊन तब्बल ३० वर्षे झाली आहेत. सध्या…